जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Honeymoon म्हणताच अंकिता लोखंडेला आठवतात या 5 गोष्टी, VIDEO शेअर करत म्हणाली...

Honeymoon म्हणताच अंकिता लोखंडेला आठवतात या 5 गोष्टी, VIDEO शेअर करत म्हणाली...

Honeymoon म्हणताच अंकिता लोखंडेला आठवतात या 5 गोष्टी, VIDEO शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) 14 डिसेंबरला मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकले. तिच्या लग्नातील सोहळ्यांना कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. विकी आणि अंकिता यांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. लग्नानंतर हे स्टार कपल अजूनही हनीमूनला गेलेलं नाही.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई,14 एप्रिल- अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) 14 डिसेंबरला मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकले. तिच्या लग्नातील सोहळ्यांना कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. विकी आणि अंकिता यांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. लग्नानंतर हे स्टार कपल हनीमूनला गेलेलं नाही. अंकिता आणि विकी सध्या स्टार प्लसवरील स्मार्ट जोडी (Smart Jodi) या कार्यक्रमात स्पर्धक आहेत. विकी आणि अंकिताचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात हनीमून (Honeymoon) म्हटलं की डोळ्यासमोर कोणत्या पाच गोष्टी येतात, याचा या दोघांनी खुलासा केलाय. या शोचा एक प्रोमो रिलीज करण्यात आलाय. ज्यामध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन त्यांना हनीमून म्हटलं की कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर येतात, याचा खुलासा करतात. अंकिता सांगते की, हनीमून म्हटलं की तिच्या डोळ्यासमोर येतं हनी, मून, डेस्टिनेशन म्हणजेच ठिकाण, बिप… आणि प्रेम. तर, दुसरीकडे विकी म्हणतो की, भरपूर खर्च, बायकोचे नखरे, मेहनत, भोवताली लोक नसतील आणि खूप सारं प्रेम. या दोघांना हनीमून शब्द ऐकल्यावर मनात काय येतं, असा प्रश्न विचारला त्यावर अंकिता आणि विकीने उत्तर दिलं. दरम्यान, अंकिताने हनीमून ऐकल्यावर या 5 गोष्टी आपल्या मनात आल्या, अशा कॅप्शनने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. दुसरीकडे स्टार प्लसनेही या शोचा एक प्रोमो व्हिडिओ रिलीज केलाय. ज्यामध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचं गुपित उलगडलंय. प्रोमोमध्ये विकी जैन अंकिता लोखंडेचा घुंघट उघडताना दिसत आहे. शोचा होस्ट मनीष पॉल विकी जैनला विचारतो की ‘सुहागरातमध्ये हनीमूनसारखं काहीतरी घडले का?’ ज्यावर विकी जैन म्हणतो ‘नाही… त्या रात्री सुहागरात होऊ शकली नाही.’ तेव्हा अंकिता लाजते आणि म्हणते, ‘यार, हा तर झोपला होता. मला वाटलं की तो छान तयार होऊन येईल.’ अंकिताने असं म्हणताच तिथं सगळे जण हसायला लागले.

    जाहिरात

    दरम्यान, चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अंकिता आणि विकी जैन यांनी लग्नगाठ बांधली. 10 एप्रिल हा दिवस खास असल्याचं अंकिताने पोस्ट करत म्हटलं होतं. याच दिवशी तिच्या आयुष्यात विकी जैन आला होता. अंकिताने एक पोस्ट शेअर करून या खास दिवसाची आठवण जागवली. तिनी लिहिलं की, ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस आहे, हाच तो दिवस ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझं आयुष्य आनंदानी भरून टाकलंस. तू एक काळजी घेणारा आणि चांगला प्रियकर आहेस आणि आता एक चांगला पतीदेखील आहेस, आपल्या दोघांना 4 वर्षांच्या नात्याच्या शुभेच्छा,’ असं अंकिता म्हणाली होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात