मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Indian Idol मध्ये फिक्सिंग? अंजली गायकवाडच्या एलिमिनेशनवर काँग्रेस आमदारही भडकला

Indian Idol मध्ये फिक्सिंग? अंजली गायकवाडच्या एलिमिनेशनवर काँग्रेस आमदारही भडकला

अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) हिच्या एलिमेशनमुळं इंडियन आयडल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. फिक्सिंग करुन तिला बाहेर काढलं असा आरोप संतापलेले प्रेक्षक करत आहेत. अन् यामध्ये काँग्रेसचे आमदार अजय माकन देखील सामिल आहेत.

अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) हिच्या एलिमेशनमुळं इंडियन आयडल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. फिक्सिंग करुन तिला बाहेर काढलं असा आरोप संतापलेले प्रेक्षक करत आहेत. अन् यामध्ये काँग्रेसचे आमदार अजय माकन देखील सामिल आहेत.

अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) हिच्या एलिमेशनमुळं इंडियन आयडल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. फिक्सिंग करुन तिला बाहेर काढलं असा आरोप संतापलेले प्रेक्षक करत आहेत. अन् यामध्ये काँग्रेसचे आमदार अजय माकन देखील सामिल आहेत.

मुंबई 7 जून: इंडियन आयडल (Indian Idol) हा कधीकाळी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय संगीत शोंपैकी एक म्हणून ओळखला जायचा. सध्या या शोचं 12 वं पर्व सुरु आहे. परंतु गेल्या काही काळात यामध्ये केल्या जाणाऱ्या काही पब्लिसिटी स्टंटमुळं TRP च्या बाबतीत इंडियन आयडल कमालीचा मागे पडला आहे. शिवाय जे प्रेक्षक पाहतात ते या शोवर कुठल्या ना कुठल्या कारणामुळं सतत टीका करताना दिसत आहेत. यावेळी गायिका अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) हिच्या एलिमेशनमुळं इंडियन आयडल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. फिक्सिंग करुन तिला बाहेर काढलं असा आरोप संतापलेले प्रेक्षक करत आहेत. अन् यामध्ये काँग्रेसचे आमदार अजय माकन देखील सामिल आहेत.

शोच्या फॉरमेटनुसार दर आठवड्याला एक स्पर्धक एलिमिनेट केला जातो. प्रेक्षकांचं वोटिंग आणि परिक्षकांचे गुण यांची सरासरी काढून हा निर्णय घेतला. नियमाप्रमाणे ज्या स्पर्धकाला सर्वात कमी वोटिंग मिळतं त्याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. यावेळी गायिका अंजली गायकवाड हिला एलिमिनेट करण्यात आलं. परंतु निर्मात्यांचा हा निर्णय काही प्रेक्षकांना आवडला नाही. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे यामध्ये काँग्रेसचे आमदार अजय माकन देखील सामिल आहेत.

‘सुशांतच्या बहिणीनंच लावली ड्रग्जची सवय’; NCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा

“ही वेळ अत्यंत कठीण आहे. कधी कुठल्या फोनवरुन काय मेसेज येईल सांगता येणार नाही. काही तासांचा एक संगीत शो आपल्याला जुन्या काळात घेऊन जातोय. यापैकी कुठलाच स्पर्धक एलिमेनेट होण्यासाठी नाही आलाय. पण तरी देखील अंजली गायकवाडला परत बोलवा.” अशा आशयाचं ट्विट करुन अजय माकन यांनी विनंती केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

इंडियन आयडलवर गेल्या काही काळात फिक्सिंगचे देखील आरोप केले जात आहेत. शोचे माजी परिक्षक सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी इंडियन आयडल स्क्रिप्टेट असल्याचं देखील म्हटलं होतं. शिवाय आजवर शोमध्ये आलेल्या अनेक विशेष पाहुण्यांनी देखील पैसे घेऊन स्पर्धकांची स्तुती करायला सांगितलं जातं असा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली गायकवाडचं एलिमिनेशन हे आधीच ठरलं होतं असा आरोप संतापलेले नेटकरी करत आहेत. शोच्या निर्मात्यांनी यावर अद्याप कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.

First published:

Tags: Indian idol, Song