21 नोव्हेंबर : ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यांनी सुरू केलेल्या स्माईल ट्रेन या संस्थेकडून मुंबईच्या शुश्रुषा रूग्णालयात एक कार्यक्रम आयोजित केला होता. संस्थेतर्फे ओठाचे व्यंग असलेल्या मुलांची मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना स्मितहास्य दिलं जातं. या कार्यक्रमाच्या वेळी ऐश्वर्या,तिची आई आणि तिची मुलगी आराध्या उपस्थित होते.
साहजिकच तिथे मोठ्या प्रमाणावर कॅमेरामनही आले होते. त्यामुळे तिथे असलेल्या लहान मुलांची थोडी गैरसोय झाली. कार्यक्रमात थोडा गोंधळ उडाला आणि त्यामुळे ऐश्वर्या कॅमेरामनवर चिडली.
तिनं विडिओग्राफर्सना शांत राहण्यास सांगितलं. हा कुठलाही प्रीमिअर,किंवा इवेंट नसून लहान मुलांसाठीचा कार्यक्रम आहे तेव्हा तुम्ही थोडं सौजन्य बाळगा असंही तिनं सांगितलं आणि यावेळी तिला अश्रू अनावर झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aishwarya rai bachchan, Crying