सनी लिओनी ही बॉलिवूडमधील सर्वात मादक अभिनेत्री म्हणून चर्चेत असते. तिचे अपडेट्स पाहण्यासाठी जगभरातील लाखो चाहते डोळ्यात तेल घालून सोशल मीडियाकडे पाहात असतात.
परंतु सनीच्या या मादक अंदाजामुळ अनेकदा तिच्यावर टीका देखील केली जाते. शिवाय कधीकाळी ती पॉर्नस्टार होती त्यामुळं अनेक पालकही तिच्या चित्रपटांना विरोध करताना दिसतात.
मात्र सनीच्या याच मादक अदांजामुळं देशातील एक शेतकरी कर्जबाजारी होण्यापासून वाचला होता. चक्क सनी लिओनीच्या बिकिनी फोटोमुळं त्याचं शेत वाचलं होतं.
आज सनीचा वाढदिवस आहे. तिच्या 40 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया हा आश्चर्यचकित करणारा किस्सा…
आंध्रप्रदेशमधील एक शेतकरी आपल्या 10 एकर जमीनीत शेती करतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याला म्हणावं तसं उत्पन्न मिळत नव्हतं.
त्याच्या जमीनीत आयर्नचं प्रमाण अधिक आहे त्यामुळं भाजीपाला अपेक्षेनुसार पिकत नव्हता. शिवाय जो काही थोडाफार पिकायचा तो पक्षी खायचे किंवा आजपासची मंडळी रात्री चोरुन न्यायचे.
अर्थात यासाठी त्यानं काही माणसं नोकरीवर ठेवली पण काही फरक पडला नाही. नुकसान होतच होतं किंबहुना तो कर्जबाजारी झाला होता.
दरम्यान त्याच्या एका मित्रानं त्याला शेतात सनी लिओनीचे बिकिनी पोस्टर लावण्याची कल्पना सुचवली त्यामुळं सर्वांची नजर तिच्या पोस्टरवर राहील आणि शेताला कोणाची नजर लागणार नाही.
शेतकऱ्यानं देखील शेवटचा पर्याय म्हणून पोस्टर लावण्यास होकार दिला. अन् त्यानं खरोखरच जागोजागी पोस्टर लावले. अन् आश्चर्याची बाब म्हणजे शेतात होणारी चोरी कमी झाली.
शेतकऱ्यानं केलेल्या दाव्यानुसार शेतात येणारे चोर सनीच्या पोस्टर्सकडे पाहात राहायचे त्यामुळं चोरीच्या घटना थांबल्या व उत्पन्न वाढल्यामुळं कर्जांचे हफ्ते वेळच्यावेळी भरता येतात. अशा प्रकारे सनीच्या बिकिनीमुळं वाचलं शेतकऱ्याचं आयुष्य