मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहीद कपूरच्या Birthday पार्टीत पुन्हा एकत्र दिसले इशान खट्टर-अनन्या पांडे, अभिनेत्रीने कुणाला म्हटलं Bestest?

शाहीद कपूरच्या Birthday पार्टीत पुन्हा एकत्र दिसले इशान खट्टर-अनन्या पांडे, अभिनेत्रीने कुणाला म्हटलं Bestest?

हे स्टारकिड्स शुक्रवारी (25 फेब्रुवारी) रात्री पुन्हा एकदा एकत्र दिसली. अनन्या पांडे ईशान खट्टरसोबत शाहीद कपूरच्या बर्थडे (Shahid Kapoor Birthday) पार्टीसाठी आली होती.

मुंबई, 26 फेब्रुवारी: बी-टाउनमध्ये सध्या ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबाबत (Ananya Panday and Ishaan Khattar Relationship Rumors) कबुली दिलेली नाही; पण दोघंही बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसतात. त्यामुळे हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही (Social Media) बरेचदा दोघं एकमेकांच्या पोस्ट्सवर कमेंट करताना आणि सतत आउटिंग करताना दिसतात. दरम्यान हे स्टारकिड्स शुक्रवारी (25 फेब्रुवारी) रात्री पुन्हा एकदा एकत्र दिसली. अनन्या पांडे ईशान खट्टरसोबत शाहीद कपूरच्या बर्थडे (Shahid Kapoor Birthday) पार्टीसाठी आली होती.

सेलेब्रिटी फोटोग्राफर्सनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, अभिनेत्री अनन्या फ्लोरल मिनी बॉडीकॉन ड्रेसमध्ये क्युट दिसत होती. ईशानने डेनिमसोबत हिरव्या रंगाचा शर्ट पेअर केला होता. हे रूमर्ड कपल 2020 मध्ये ‘खाली-पीली’ या चित्रपटात एकत्र दिसलं होतं. दरम्यान अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनही शाहीद कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तिने शाहीद कपूरच्या बर्थडे बॅशमधला (Shahid Kapoor Birthday Bash) एक सुंदर फोटो शेअर करून लिहिलं आहे की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा Sash! बेस्टेस्ट!' शाहीद कपूरची बायको मीरा राजपूतनेही अनन्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे, “My Gal!” या आधी नववर्षाच्या निमित्ताने अनन्या आणि ईशानने आपापल्या इन्स्टा अकाउंटवरून काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ही दोघं रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन करत असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता.

23 वर्षांच्या अनन्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर रणथंबोरमधला फोटो शेअर करून त्याला अशी कॅप्शन लिहिली होती, ‘चांदण्यांनी भरलेल्या आकाशा...’ या फोटोमध्ये अनन्या थंडीमध्ये मस्तपैकी शेकोटीची मजा अनुभवताना दिसत होती. ईशाननेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक असाच आकाशाची झलक असणारा फोटो शेअर केला होता. तो पाहून युजर्सना हे लगेच कळलं होतं, की ईशान आणि अनन्याने रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये एकत्र न्यू ईयरचं स्वागत केलं होतं.

बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या बनतात आणि तुटतात; पण ईशान-अनन्याची जोडी बरेच महिने टिकल्याचं दिसून येत आहे आणि त्यांना फॅन्सची पसंतीही मिळत आहे.

First published:

Tags: Ananya panday, Shahid kapoor, Shahid Kapoor-Mira Rajput