मुंबई, 30 डिसेंबर : बिझनेस टायकून आणि रिलायन्स लिमिटेड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा नुकताच साखरपुडा पार पडला. अनंत अंबानीने राधिका मर्चंट सोबत साखरपुडा केला असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याच्या बातमीने सर्वत्र आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. सोशल मीडियावर तर दोघांचीच चर्चा रंगली आहे. साखरपुड्यानंतर अंबानी कुटुंबीयांनी एक आलिशान पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये बी-टाऊनमधील अनेकांनी हजेरी लावली होती. मात्र सध्या चर्चा रंगलीये ती गायक मीका सिंह ची. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट नंतर साखरपुड्यानंतर अँटिलिया हाऊसमध्ये पोहोचले तेव्हा दोघांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. यादरम्यान मिका सिंगसह सेलेब्स देखील अँटिलिया हाऊसमध्ये सामील झाले होते. अनंत आणि राधिकाच्या स्वागतासाठी मीका सिंहने त्याच्या हटके अंदाजात गाणं म्हणलं. 10 मिनिटांच्या गाण्याने मीका सिंहने सगळ्यांचं लक्ष वेधलं.
राधिका आणि अनंतबद्दल बोलायचे झाले तर दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अनंत हा यूएस मधील विद्यापीठाचा पदवीधर आहे आणि त्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, जिओ आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये बोर्ड सदस्य म्हणून काम केले आहे.
दरम्यान, राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात अंबानी आणि मर्चट कुटुंबीयांचा हा खास कार्यक्रम संपन्न झाला. सध्या सर्वत्र अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याची चर्चा आहे. या समांरंभातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंबानींच्या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये मीका सिंह शिवाय आलिया भट्ट, रणबीर कपूर, जान्हवी कपूर, रणवीर सिंह, सलमान खान, शाहरुख खान, अशा अनेकजण उपस्थित होते.