मुंबई, 13 एप्रिल- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांना गायनाची प्रचंड आवड आहे, हे सर्वांना माहिती आहेच. नुकतीच अमृता फडणवीस यांनी आशा भोसले यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच याला एक कॅप्शन देखील दिली आहे. सध्या अमृता फडणवीस यांची पोस्ट सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चेत आली आहे. अमृता फडणवीस यांनी इन्स्टावर आशा भोसले यांच्यासोबत फोटो शेअर करत म्हटलं आहे की, मी नुकतंच आशा भोसले यांना भेटले. राज्याचा सर्वोच्च पुरस्कार असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर संगीतबाबत छान संवादही साधला. यावेळी त्यांनी मला सराव आणि व्हॉईस मॉड्युलेशनबद्दल मार्गदर्शन केले. आता आम्ही पुढील संगीत सत्रासाठी खूप उत्सुक आहोत. वाचा- IPL सुरू असताना पृथ्वी शॉला बसला धक्का, मुंबई कोर्टाने त्या प्रकरणात दिले आदेश आशा भोसले यांना शुक्रवारी 24 मार्च रोजी सायंकाळी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2021 या सालासाठी आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अमृता फडणवीस मुंबईत आल्या. त्यानंतर बँकिंगमधली आपली कारकीर्द सांभाळतानाच त्यांनी गायनातही आपलं करिअर घडवलं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेला अल्बम, प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटात गायलेलं गाणं यामुळं त्या चर्चेत आल्या होत्या. अगदी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांनी रँपवॉकही केला आहे. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.
नेहमीच त्याम्युझिक व्हिडिओजमुळे चर्चेत असतात. मार्च 2022 मध्ये महाशिवरात्रीच्या निमित्त त्यांचा शिव तांडव स्त्रोत्राचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. 2019मध्ये भाऊबिजेच्या दिवशी त्यांनी ‘तिला जगू द्या’ हे ‘बेटी बचाव’च्या मुद्द्यावरील गाणं प्रदर्शित केलं. या गाण्यातील त्यांच्या गायकीवरून त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. सोशल मीडियावर त्या सतत कोणत्या कोणत्या कारणामुळं चर्चेत असतात.