मुंबई, 20 जानेवारी : अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut) एरवी तिच्या वादविवादांमुळे चर्चेत असते. सध्या मात्र ती वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. ते म्हणजे तिचा नवा सिनेमा(new movie - Dhakad). कंगना सध्या आपला आगामी सिनेमा 'धाकड'मुळं वृत्तपत्रांमध्ये मथळ्याचा विषय बनली आहे. हा सिनेमा सिनेमागृहात 1 ऑक्टोबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. या दरम्यानच सिनेमातला दिव्या दत्ताचा (Divya Dutta) लुक (look) समोर आला आहे.
दिव्या या सिनेमात खलनायिकेच्या (vamp) भूमिकेत आहे. या पोस्टरमध्ये (poster) दिव्यानं साडी नेसली आहे. सोबतच तिनं हातात कडं घालून पायांना आळता लावल्याचंही दिसतं. या लूकमध्ये ती खूपच लक्षवेधी दिसत आहे. दिव्याच्या कपाळावर टिकली आहे. आणि तिचा लूक एकदम डार्क,खलनायकी शेडचा (dark shade) दिसतो आहे.
दिव्या दत्तानं सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, की मी जी भूमिका करतेय ती एकदम खतरनाक आहे. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, की सिनेमातलं हे पात्र किती डेंजर असू शकतं. मी 'धाकड' या सिनेमातून आपली नवी व्यक्तिरेखा सादर करते आहे. या व्यक्तिरेखेचं नाव आहे रोहिणी. धाकड सिनेमा 1 ऑक्टोबर 2021 ला रिलीज (release)होईल.
या सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत आहे. या स्पाय-ऍक्शन सिनेमात कंगना एका स्पेशल एजंटच्या रुपात दिसेल. तिच्या या व्यक्तिरेखेचं नाव अग्नि आहे. दिव्या दत्ताच्या आधी कंगनाचाही लूक समोर आला आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये कंगना हातात तलवार घेऊन बसलेली दिसते आहे. तिच्या बॅकग्राउंडमध्ये प्रेतांचा खच पडलेला असतो. यावरून समजतं, की कंगनाची भूमिका अतिशय दमदार होणार आहे. याशिवाय अर्जुन रामपालचीही (Arjun Rampal) या सिनेमात वेधक भूमिका आहे. कंगनाच्या चाहत्यांना (fans) हा सिनेमा नक्कीच आवडेल.