
नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर क्राईम, हॉरर, रोमान्स आणि अॅक्शन-पॅक्ड चित्रपट आणि वेब सिरीज स्ट्रीम केल्या जातात. लोकप्रिय कादंबरीवर आधारित अनेक उत्तम वेब सिरीज पाहायला मिळत आहेत.आज अशाच काही वेब सिरीज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.

स्टेट ऑफ सीज 26/11: या सीरिजची कथा संदीप उन्नीथन यांच्या 'ब्लॅक टॉर्नेडो: द थ्री सीज ऑफ मुंबई' या कादंबरीवर आधारित आहे.

द मॅरीड वुमन: ही सीरिज ALT Balaji वर प्रसारित केली जात आहे. जी त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. 'द मॅरीड वुमन'चे लेखक मजनू कपू हे आहेत.

अनबिलीव्हेबल: ही सीरिज नेटफ्लिक्सवर 2019 मध्ये रिलीज रिलीज झाली होती. ही सीरिज केन आर्मस्ट्राँग आणि क्रिश्चियन मिलर यांच्या 'द फॉल्स रिपोर्ट' या पुस्तकावर आणि त्यांच्या अनबिलीव्हेबल स्टोरी ऑफ रेप' या लेखावर आधारित आहे.

अनऑर्थोडॉक्स: ही सीरिज 'अनर्थोडॉक्स: द स्कँडलस रिजेक्शन ऑफ माय हॅसिडिक रूट्स' या पुस्तकावर आधारित आहे. डेबोराह फेल्डमन या लेखिकेचे हे आत्मचरित्र आहे. ही एक उत्तम अमेरिकन-जर्मन सीरिज आहे.

अ सुटेबल बॉय: मीरा नायर दिग्दर्शित ही मालिका विक्रम सेठ यांच्या 1993 मध्ये याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

सेक्रेड गेम्स: ही प्रसिद्ध सीरिज 2006 मध्ये विक्रम चंद्राच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.




