जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Pushpa 2 Star Fees: पुष्पा 2 साठीची अल्लू अर्जुनची फी ऐकून बसेल धक्का, त्यासमोर रश्मिकाही फिकी

Pushpa 2 Star Fees: पुष्पा 2 साठीची अल्लू अर्जुनची फी ऐकून बसेल धक्का, त्यासमोर रश्मिकाही फिकी

Pushpa 2 Star Fees: पुष्पा 2 साठीची अल्लू अर्जुनची फी ऐकून बसेल धक्का, त्यासमोर रश्मिकाही फिकी

पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहे. अशातच या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑगस्ट: ‘पुष्पा’ (pushpa movie)चित्रपटानं संपूर्ण भारताला वेड लावलेलं पहायला मिळालं. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा’नं रेकाॅर्डब्रेक कमाई केली. चित्रपटातील डायलॉग, गाणी, हुकस्टेप जगभर प्रसिद्ध झाल्या. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहे. अशातच या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे नाव ‘पुष्पा द राईज’ होते तर दुसऱ्या भागाचे नाव ‘पुष्पा द रुल’ असणार आहे. नुकतेच यासाठी एका पूजेचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. अल्लू अर्जुन पुष्पा 2 साठी 125 कोटी घेत असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर सुकुमार 50 कोटी घेत आहेत आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यासाठी 5 कोटी घेत आहेuत.  हा चित्रपट जानेवारी महिन्यात जगभरातील पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुष्पा 2 चे शूटिंग सुरू करू शकतो. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हेही वाचा -  Ind vs Pak: विजय देवरकोंडानेही लावली स्टेडियममध्ये हजेरी, कुर्ता-पायजामामध्ये पाहून चाहते म्हणाले… पुष्पा द राइज 21 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनने तर खळबळ उडवून दिली होतीच, शिवाय हिंदीतही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. सगळीकडे पुष्पाचीच क्रेझ पहायला मिळत होती. त्यामुळे पुष्पाच्या पहिल्या भागाला मिळालेला रिसपॉन्स पाहता दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) सध्या सतत चर्चेत असतो. ‘पुष्पा’ सिनेमाच्या भरघोस यशानंतर तर तो आणखीनच प्रकाश झोतात आला आहे. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुनची बॉलिवूडमधील लोकप्रियता गगनाला भिडली आहे. पहिल्यापेक्षा त्याचा चाहतावर्ग आणखीनच वाढला आहे. दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत चालली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात