बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते चित्रपटाची वाट पाहत होते.
चित्रपटाचं कौतुक आणि टीका दोन्ही होत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवरचांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवसाची कमाई पाहता, आलियाचा हा चित्रपट विकेंडला धमाल करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
गंगूबाई काठियावाडीने पहिल्याच दिवशी कोट्यावधींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, आलिया भट्टच्या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन सुमारे 9.50-10 कोटी इतके आहे.
नुकतेच प्रदर्शित झालेले इतर चित्रपट आणि त्यांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन पाहता आलियाच्या चित्रपटाचं हे कलेक्शन चांगलं मानलं जात आहे.
कोरोना महामारीनंतर चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी मोठी कमाई करणारा हा दुसरा चित्रपट मानला जात आहे.
या चित्रपटाची चांगली सुरुवात आहे. आणि एका अभिनेत्रीवर आधारित चित्रपटासाठी हा दुसरा सर्वोच्च ओपनर चित्रपट मानला जात आहे.