रणबीर कपूर आलिया भट्टने दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र आई कालीचे आशीर्वाद घेतल. यादरम्यान दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.
खरं तर, मुंबईतील 'नॉर्थ बॉम्बे पब्लिक दुर्गा पूजा कमिटी'च्या पंडालमध्ये कालीपूजेच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघेही आई कालीचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीही तिथे होता.
याआधी रात्री उशिरा रणबीर, आलिया आणि अयानने माँ काली मातांचं आशीर्वाद घेतला. रणबीर आणि आलिया दोघांनीही आईची पूजा केल्यानंतर पापाराझी पोज दिल्या मात्र काहीही प्रतिक्रया न देता तिथून निघून गेले.
दिवाळीच्या मुहूर्तावर आलियाने सर्वांना चकित केले. तिने रणबीरसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. ही पहिलीच वेळ आहे की आलियाने रणबीरसोबत असे फोटो पोस्ट करत खुलेपणाने प्रेम व्यक्त केले आहे.
आलिया फोटोमध्ये रणबीर कपूरसोबत रोमँटिक पोज देत आहे. यावेळी रणबीरने गडद निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. आलियाने या फोटोला कॅप्शन दिले आहे- 'आणि थोडेसे प्रेम… दिवाळीच्या शुभेच्छा.' त्याच्या या फोटोवर चाहते खूप कमेंट करत आहेत.
गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत अनेक अटकळ बांधल्या जात आहेत आणि असे बोलले जात आहे की दोघेही याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत, परंतु आतापर्यंत दोघांनीही लग्नाबाबत अधिकृत घोषणा केली नाहीय.
कामाबद्दल सांगायचं झालं तर, आलिया आणि रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय 'गंगूबाई काठियावाडी', 'रॉकी और राणीकी प्रेमकहाणी' आणि 'RRR' हे आलियाचे आगामी चित्रपट आहेत.