पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर सध्या आपल्या फिटनेसकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. आपला फिटनेस राखण्यासाठी अभिनेत्री अतिशय मेहनत घेत आहे. तसेच सर्वांना हार्ड वर्क करण्याचा सल्लासुद्धा देत आहे.
अक्षया देवधरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अतिशय हार्ड एक्सरसाईज करताना दिसून येत आहे.
अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती विविध आणि कठीण योगा पोज देताना दिसून येत आहे. अक्षयाने आपले फोटो शेअर करत छान कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे.
अक्षया देवधरने कॅप्शन लिहीत म्हटलं आहे, 'तुम्ही अजूनही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नसाल. परंतु नक्कीच तुम्ही आज कालपेक्षा जास्त जवळ पोहोचलेले आहात'.
तसेच तिने पुढं लिहिलं आहे, 'त्यामुळे प्रयत्न करत राहा. आणि हार्ड वर्क करा'. अक्षयाच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अक्षया देवधरने फोटो शेअर करत अनुज शेळकेचे आभार मानले आहेत. अर्थातच अभिनेत्री त्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे.
अनुज शेळके हा एक फिटनेस कोच आहे. त्याने अनेक मराठी कलाकरांना आपला फिटनेस राखण्यासाठी मदत केली आहे.
अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. मालिकेतील रांगडा राणा आणि सुंदर, सुशिक्षित अंजलीबाई यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती.