बॉलिवूडचा 'खिलाडी' अभिनेता अक्षय कुमार सतत चर्चेचा केंद्रबिंदू असतो. अशातच तो एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे.
अक्षय कुमार सर्वात जास्त इनकम टॅक्स भरणारा सेलिब्रिटी बनला आहे. इनकम टॅक्स विभागानं अक्षय कुमारला प्रमाणपत्र देऊन सन्मान देखील केलाय.
गेल्या वर्षी अक्षयनं 29.5 कोटी रुपये कर भरला होता, तर या वर्षाची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. यासोबतच अक्षय कुमारने पृथ्वीराज या चित्रपटासाठी 60 कोटींची फी घेतली होती.
जास्त इनकम टॅक्स भरणाऱ्यांपैकी अक्षय हा एकटाच सेलिब्रिटी नाहीये. तर अक्षय व्यतिरिक्त अनेक कलाकार मोठ्या प्रमाणावर इनकम टॅक्स भरतात.
बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानदेखील मोठ्या प्रमाणावर इनकम टॅक्स भरतो. दरवर्षी शाहरुख खान 22 कोटी इनकम टॅक्स भरतो असं समोर आलंय.
हिंदी सिनेमातील हॅंडसम हंक अभिनेता हृतिक रोशनही मोठ्या प्रमाणात इनकन टॅक्स भरत असतो. हृतिक दरवर्षी सुमारे 22.5 कोटींचा इनकंम टॅक्स भरतो.