मुंबई, 5 सप्टेंबर: दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे स्टारर ‘लाइगर’ चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा पहायला मिळाली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढी कमाल दाखवू शकला नाही. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि तो पाहिल्यानंतर लोकांच्या सतत नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 125 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आठ दिवसांत 40 कोटींचा आकडा पार करू शकलेला नाही. त्यामुळे ‘लाइगर’च्या संपूर्ण टीमला मोठ्या नुकसानास सामोरं जावं लागत आहे. ‘लाइगर’ चित्रपटाच्या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाइगरच्या अपयशामुळे चित्रपटाची सहनिर्माती चार्मी कौरने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. चार्मी कौरनं ट्विटरवर सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली. चार्मी म्हणाली,‘चिल मित्रांनो! सोशल मीडियातून फक्त ब्रेक घेत आहे. पुरी जगन्नाथ दमदार प्रदर्शनासह परत येतील…तोपर्यंत जगा आणि जगू द्या’. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Chill guys!
— Charmme Kaur (@Charmmeofficial) September 4, 2022
Just taking a break
( from social media )@PuriConnects will bounce back 😊
Bigger and Better...
until then,
Live and let Live ❤️
विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी पुढील चित्रपट ‘जन गण मन’साठी त्यांची फी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जन गण मन’ चित्रपटाचे बजेट निम्मे करण्यात आले आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या कथेवरही फेरविचार केला जात आहे. विजयच्या या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत. अशा परिस्थितीत विजय आणि पुरी यांना मेकर्सचे मोठे नुकसान भरून काढायचे आहे. हेही वाचा - Celebes Education:अभिनेता बनण्यापूर्वी ‘या’ क्षेत्रात सक्रिय होता करण कुंद्रा; एका मालिकेनं बदललं नशीब दरम्यान, विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा ‘लायगर’ हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला. त्यामुळे सध्या या चित्रपटाविषयी रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत.