मुंबई, 8 डिसेंबर : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती चांगलीच चर्चेत आली. तेव्हापासून तिच्या प्रत्येक गोष्टीवर नेटकऱ्यांची नजर असून तिची छोट्यातली छोटी गोष्ट चर्चेचा विषय ठरत असते. अशातच आता रिया पुन्हा एकदा चर्चेत आली असून याचं कारण म्हणजे ती एक व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. सुशांतनंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकी कोणत्या व्यक्तीने एन्ट्री घेतलीये असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. चला तर मग पाहुया नक्की कोण आहे तो मिस्ट्री बॉय. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात पुन्हा नवं प्रेम फुलत आहे. रिया पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्ती मुंबईतील एका बिझनेसमॅनला डेट करत आहे. हा बिझनेसमॅन दुसरा तिसरा कोणी बंटी सजदेह आहे. बंटी हा टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी चालवतो. एवढंच नाही तर रिया देखील त्याची क्लाएंट आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र अद्याप दोघांनाही त्यांचं नातं अधिकृत करायचं नाही.
बंटी सजदेह टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचा मालक असण्याव्यतिरिक्त अभिनेता सोहेल खानची माजी पत्नी आणि अभिनेत्री सीमा सजदेहचा भाऊ देखील आहे. सीमा ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज’ या मालिकेत दिसली आहे. सध्या रिया आणि बंटीच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. रियापूर्वी बंटीचे नाव अनेक बॉलिवूड सुंदरींसोबत जोडले गेले आहे. सुष्मिता सेन ते सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक अभिनेत्री बंटीच्या गर्लफ्रेंड होत्या.
दरम्यान, सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करण्यात आले. ड्रग्ज प्रकरणातही तिचा हात असल्याचा आरोप होत होता. या प्रकरणात अभिनेत्री कसून चौकशी झाली. तेवढंच नाही तर रियाच्या कुटुंबाचीही चौकशी करण्यात आली होती. 2020 वर्ष रियासाठी खूपच वेदनादायक होतं. अभिनेत्री हळूहळू सोशल मीडियावर सक्रिय झाली आणि आयष्यात पुढे जाऊ लागली. आता तिच्या आयुष्यात नवं प्रेमदेखील आलं आहे.