मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सिद्धू मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकाचा मृत्यू, 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिद्धू मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकाचा मृत्यू, 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या मृत्यूने सगळीकडे एकच खळबळ पहायला मिळाली. अशातच आता सिद्धू मूसेवालाच्या निधनानंतर आणखी एका पंजाबी गायकाचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 सप्टेंबर: पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या मृत्यूने सगळीकडे एकच खळबळ पहायला मिळाली. अशातच आता सिद्धू मूसेवालाच्या निधनानंतर आणखी एका पंजाबी गायकाचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक निरवैर सिंहचा ऑस्ट्रेलियात एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. 42 व्या वर्षी निरवैर सिंहनं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच पंजाबी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी मेलबर्नमध्ये तीन वाहनांच्या धडकेमुळे एक धक्कादायक अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका पुरुष आणि महिलेलाही अटक केली आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप झालेले नाहीत. निरवैर सिंग हे घरून कामानिमित्त निघाले असताना त्यांचा अपघात झाल्याचं समोर आलं. या अपघातात एकजण जखमी झालं असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

'माय टर्न' अल्बममधील तेरे बिना या गाण्याने नीरवैर सिंहला प्रसिद्धी मिळाली. त्याच्या इतर हिट चित्रपटांमध्ये 'दर्द-ए-दिल', 'जे रसगी', 'फेरारी ड्रीम' आणि 'हिक ठोक के' यांचा समावेश आहे. नऊवर्षापूर्वी तो गायनात करिअर करण्यासाठी ऑस्ट्रेलियात आला होता.

दरम्यान, निरवैर सिंगच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रांना धक्का बसला आहे. सगळेचजण निरवैरच्या जाण्याचं दुःख व्यक्त करत आहे.

First published:

Tags: Death, Panjab, Singer, Social media