S M L
Football World Cup 2018

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर 13व्या दिवशी जान्हवीनं सुरू केलं शूटिंग

श्रीदेवीच्या निधनानंतर 13व्या दिवशी जान्हवीनं शूटिंगला सुरुवात केलीय. सैराटवर बनत असलेल्या धडकमध्ये जान्हवी काम करतेय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 9, 2018 08:15 PM IST

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर 13व्या दिवशी जान्हवीनं सुरू केलं शूटिंग

09 मार्च : श्रीदेवीच्या निधनानंतर 13व्या दिवशी जान्हवीनं शूटिंगला सुरुवात केलीय. सैराटवर बनत असलेल्या धडकमध्ये जान्हवी काम करतेय. तिनं आपली कमिटमेंट पाळलीय.

धडकचं शूटिंग जोरात सुरू आहे. म्हणूनच श्रीदेवी-बोनी कपूर लग्नासाठी दुबईला गेले होते तेव्हा जान्हवी शूटिंग करत होती. ती काही दुबईला जाऊ शकली नाही. आणि श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी तिला सेटवरच कळली. अनिल कपूरनेच तिला कळवली होती.

जान्हवीची बाॅलिवूड एन्ट्री हे श्रीदेवीचं स्वप्न होतं. पण दुर्दैवीनं जान्हवीचा पहिला सिनेमा पाहायला ती नाहीय. जान्हवीचं सेटवरचं 'धडक'मधलं मराठमोळं रूप पाहून अनेकांना 'इंग्लिश विंग्लिश'मधल्या श्रीदेवीची आठवण आली.

जान्हवीनं श्रीदेवीच्या मृत्यूनंतर लिहिलेलं पत्र मनाला भिडणारं होतं. त्यात तिनं मी आईला खूश ठेवण्याचा आणि माझा अभिमान वाटण्याचा रोज प्रयत्न करेन. श्रीदेवीच्या जाण्यानंतर लगेच शूटिंग सुरू करण्याचं हे जान्हवीचं पहिलं पाऊल म्हणता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2018 08:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close