ऋषी कपूर-इरफान खाननंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का, या प्रसिद्ध व्यक्तीचं झालं निधन

ऋषी कपूर-इरफान खाननंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का, या प्रसिद्ध व्यक्तीचं झालं निधन

फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाचे CEO कुलमीत मक्कड यांचं मुंबईमध्ये निधन झालं.

  • Share this:

मुंबई, 1 मे : बुधवारी 29 एप्रिलला अभिनेता इरफान खान आणि गुरुवार 30 एप्रिल ऋषी कपूर यांच्या निधनानंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाचे CEO कुलमीत मक्कड यांचं मुंबईमध्ये निधन झालं. निर्माता आणि दिग्दर्शक करण जौहर आणि अशोक पंडित यांनी याबाबतच्या वृत्ताला सोशल मीडियावरून पुष्टी दिली आहे. कुलमीत यांचं निधन हृदयविकाराच्या धक्क्यानं झालं. याबाबत बॉलिवूडमध्ये दुःख व्यक्त केलं जात आहे.

करण जोहरनं याबाबत ट्वीट केलं आहे. त्यानं लिहिलं, कुलमीत तुम्ही प्रोड्यूसर गिल्डचे आधारस्तंभ होता. बॉलिवूड इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी तुम्ही सतत कार्यरत होता. तुम्ही आम्हाला खूपच लवकर सोडून गेलात. आज तुम्ही आमच्यात नसलात तरीही सर्वांच्या आठवणीत तुम्ही नेहमीच राहाल.

याशिवाय अभिनेत्री विद्या बालनं सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत कुलमीत यांना श्रद्धांजली वाहिली. हे खरंच धक्कादायक असल्याचं तिनं म्हटलं आहे.

बुधवारी 29 एप्रिलला इरफान खानचं निधन झालं. इरफान खानला कोलन इन्फेक्शन (Colon Infection)होतं. 54 वर्षीय इरफानला 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. कॅन्सरशी दोन हात केल्यानंतर इरफान भारतात परतला. त्यानं त्याचा अंग्रेजी मीडियम या सिनेमाचं शूटिंग सुद्धा पूर्ण केलं मात्र त्यानंतर त्याची तब्बेत पुन्हा खालावली. दरम्यान त्यानंतर त्याच्या मुंबईच्या कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.

इरफान खानच्या मृत्यूनंतर चाहते सावरत असतानाच त्यांना सगळ्यात मोठा झटका बसला तो अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनानं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळं त्यांना बुधवारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. अखेर बुधवारी 30 एप्रिलला सकाळी 8:45 वाजता ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर दोन वर्ष ल्यूकेमिया या आजारानं ग्रस्त होते. ऋषी कपूर यांनी 1970 सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी 1973 साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांची ओळख कायम बॉलिवूडमधला चार्मिंग हिरो म्हणून राहिली.

(संपादन- मेघा जेठे. )

Tags: Bollywood
First Published: May 1, 2020 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading