मुंबई,22 एप्रिल- 'बाहुबली' (Bahubali) फेम साऊथ दिग्दर्शक (South Director) SS राजामौली (SS Rajamouli) यांचा RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळाली होती. चित्रपट रिलीजनंतर चित्रपटगृहे हाऊसफुल झाले होते. अनेक लोकांनी या चित्रपटाचा आनंद घेतला आहे. पण असेही असंख्य लोक आहेत, ज्यांना चित्रपटगृहांमध्ये जाणं शक्य झालं नाही. किंवा त्यांना ते पसंत नाही. असे लोक चित्रपटाच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगची प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. RRR लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.
RRR चित्रपट ZEE 5 आणि Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. OTT वर हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक यूजर्स ट्विटरवर प्रश्न विचारतानाही दिसले होते. रिपोर्टनुसार, Zee5 आणि Netflix ने चित्रपटाचे डिजिटल डिस्ट्रिब्युशन हक्क खरेदी केले आहेत. Netflix ने हिंदी-डब व्हर्जन तर Zee5 तमिळ, तेलुगु आणि मल्याळम व्हर्जन जारी करत आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी, इंग्रजी, कोरियन, पोर्तुगीज, तुर्की आणि स्पॅनिश भाषेत उपलब्ध असणार आहे.
तथापि यापैकी कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मने अद्याप अधिकृत घोषणा केली नाहीय. परंतु सूत्रांनी उघड केले आहे की 25 मे ते जूनच्या सुरुवातीपर्यंत RRR चे डिजिटल स्क्रीनिंग होऊ शकते. हा चित्रपट 3 जून 2022 रोजी ऑनलाइन प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्या अधिकृत घोषणेबाबत अजूनही प्रतीक्षा करावी लागेल.
स्टँन्डर्ड रुल्सनुसार, कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 75 ते 90 दिवसांनी ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची परवानगी आहे. ई-नेटवर्कने RRR चे डिजिटल आणि सॅटेलाइट अधिकार 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले जात आहे.सर्वानांच माहिती आहे की राजामौली यांच्या RRR ने भारतात आणि जगभरातील बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Netflix, OTT, South film, Zee media