जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / भीक मागून जगणारी मरिना बनली अभिनेत्री, एका फोटोने उध्वस्त झालं आयुष्य, तालिबान्यांनीं दिला डोकं छाटण्याचा आदेश

भीक मागून जगणारी मरिना बनली अभिनेत्री, एका फोटोने उध्वस्त झालं आयुष्य, तालिबान्यांनीं दिला डोकं छाटण्याचा आदेश

अफगाणिस्तानची अभिनेत्री मरिना गुलबहारी लाईफ स्टोरी

अफगाणिस्तानची अभिनेत्री मरिना गुलबहारी लाईफ स्टोरी

Afghanistan Actress Marina Goalbahari Life Story: कलाकार आणि ग्लॅमर यामागे अनेक मोठी गुपिते दडलेली असतात असं नेहमीच म्हटलं जातं. आपण आज अशाच एका अंतरराष्ट्रीय अभिनेत्रीबाबत जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,21 मे- कलाकार आणि ग्लॅमर यामागे अनेक मोठी गुपिते दडलेली असतात असं नेहमीच म्हटलं जातं. आपण आज अशाच एका अंतरराष्ट्रीय अभिनेत्रीबाबत जाणून घेणार आहोत. जिला केवळ एका फोटोमुळे निर्वासित आयुष्य जगावं लागत आहे. आजही ती आपला जीव वाचवून कुटुंबापासून दूर आपलं आयुष्य घालवत आहे. मरिना गुलबहारी ही अफगाणिस्तानची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. परंतु तिच्या आयुष्यबाबत वाचून तुमचाही थरकाप उडेल. अफगाणिस्तानमध्ये चित्रपट आणि मनोरंजनाच्या इतर गोष्टींवर बंदी आहे. या देशात आत्तापर्यंत केवळ 53 चित्रपट बनवण्यात आले आहेत. 2001 मध्ये याठिकाणी पुन्हा चित्रपट बनण्यास सुरुवात झाली होती. याकाळात मरिना गुलबहार ही अभिनेत्री म्हणून नावारुपास आली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, मरिना ही अवघ्या 12वर्षांच्या वयात रस्त्यावर भीक मागून आपलं आयुष्य जगत होती. असंच एके दिवशी एक दिग्दर्शक रस्त्यावरुन फिरत होते. त्यावेळी त्यांची नजर एका मुलीवर पडली जी दारोदारी भीक मागत होती. ती मुलगी इतर कुणी नसून मरिना होती. (हे वाचा: Taarak Mehta मध्ये चाललंय काय? आता बावरीने केले धक्कादायक आरोप, जेठालालसोबत घडलेलं असं काही… ) ते दिग्दर्शक मरिनाजवळ आले, आणि त्यांनी तिला चित्रपटांमध्ये काम करणार का? असं विचारलं यावर घाबरलेल्या मरिनाने मी नाही करणार असं उत्तर दिलं. आणि पुढे म्हटलं मला माहितेय चित्रपटांमध्ये काय असतं? यावर त्यांनी काय असतं? विचारल्यावर मरिना म्हणाली, मी एक-दोन वेळा चोरुन हिंदी चित्रपट पहिले आहेत. त्यामध्ये अभिनेत्री लहान ड्रेस घालून डान्स करत असतात. तुम्हीसुद्धा मला हेच करायला सांगणार. यावर दिग्दर्शक हसले आणि म्हणाले, ‘ते ग्लॅमरस चित्रपट असतात. आपण तसे नाही बनवणार तू घाबरु नको’. त्यांनंतर मरिनाने होकार दिला. कारण तिला दिग्दर्शकांनी काम केल्यास चांगले पैसे मिळतील असं आश्वासन दिलं होतं. मरिनाची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यांना जेवायला अन्न नव्हतं. त्यामुळे तिने पैसे मिळणार या वाक्याने होकार दिला होता. मरिनाला तब्बल 7 भावंडे होती. तिचे वडील अतिशय गरीब व्यक्ती होते. या सर्व मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना भीक मागावी लागत असे. यातून मरिना एक अभिनेत्रीनं बनली होती.

News18लोकमत
News18लोकमत

एका फोटोने उध्वस्त झालं आयुष्य- अभिनेत्री बनल्यानंतर मरिना गुलबहारला कोरियामध्ये एका कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं. यावेळी मरिना सहभागी तर झाली मात्र तिने डोक्यावर ओढणी घेतलेली नव्हती. तिचे हे फोटो समोर आल्यानंतर तालिबान्यांनी पाहिले. आणि अफगाणिस्तानची महिला असून अभिनेत्रीने डोकं न झाकता सर्वसांसमोर आल्याने तिचं डोकं छाटण्याचे आदेश देऊन टाकले. ही गोष्ट मरिनाला समजल्यानंतर ती आपल्या देशात प्रतलीच नाही. कोरियामधून ती फ्रांसला रवाना झाली. 2016  पासून आज पर्यंत ती याच ठिकाणी एका निर्वासित लोकांसाठी असलेल्या कॅम्पमध्ये आपलं आयुष्य जगत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात