
विद्युत जामवालच्या कमांडो या चित्रपटामुळं प्रकाशझोतात आलेली अदा शर्मा एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

यावेळी देखील तिनं असेच काही लक्षवेधी फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये तिनं वेगळ्याच प्रकारचा वेश परिधान केला आहे.

परिणामी तिचे फोटो पाहून काही नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत. तू नेमकं हे काय घातलं आहेस? असा सवाल करत तिला काहीजण ट्रोल करत आहेत.

यापूर्वी देखील अदाला तिच्या हटके फोटोंमुळं ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावेळी तिनं माझ्या फोटोंकडे दुर्लक्ष करा हे फोटो तुमच्यासाठी नाहीत असं प्रत्युत्तर ट्रोलर्सला दिलं होतं.

अदानं 1920, फीर, हार्ट अटॅक, बायपास रोड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु कमांडो या चित्रपट मालिकेमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली.




