मुंबई, 18 फेब्रुवारी : अदा शर्मा (Adah Sharma) ही भारतीय सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओज नेहमीच चर्चेत असतात. अदाचा असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या चक्क आपल्या आजीसोबत ड्रंक अँड हाय डान्स (Drunk N High Song) करताना दिसत आहे. हा व्हिडीओ काही तासांत 93 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. अदा शर्माचं ड्रंक अँड हाय (Drunk N High Song) हे गाणं अलिकडेच प्रदर्शित झालं. हे गाणं सध्या रॅप सॉन्ग चाहत्यांमध्ये विशेष चर्चेत आहे. याच लोकप्रिय गाण्यावर अदानं आपल्या आजीसोबत डान्स केला. या व्हिडीओमध्ये दोघांनीही काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. या व्हिडीओत दोघंही जबरदस्त डान्स मूव्ह करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत तब्बल 93 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अवश्य पाहा - VIDEO: ‘शंकरपाळ्या बोललास तर याद राख;’ चला हवा येऊ द्यामधील कलाकारांचं झालं भांडण अदा शर्मा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2008 साली 1920 या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं ‘फिर’, ‘हम है राही कार के’, ‘कल्की’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. हिंदीसोबतच ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली आहे. ‘हार्ट अटॅक’, ‘कमांडो’, ‘चार्ली चॅप्लिन 2’, ‘कशनम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं महत्वाच्या भूमिका साकारल्या. सध्या ती आजीसोबत केलेल्या एका डान्स व्हिडीओमुळं चर्चेत आहे.