जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Tejaswini Pandit ने सांगितला तो 'अथांग' अनुभव; म्हणाली 'एक कलाकार म्हणून वावरताना...'

Tejaswini Pandit ने सांगितला तो 'अथांग' अनुभव; म्हणाली 'एक कलाकार म्हणून वावरताना...'

तेजस्विनी पंडित

तेजस्विनी पंडित

आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मराठीमोठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित कायम चर्चेत असते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर : आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मराठीमोठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित कायम चर्चेत असते. तिच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी अफाट प्रेम दिलं आहे. अशातच अभिनेत्रीने प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या अथांग’ वेबसिरीडमधील एका बॉडी डबलची भूमिका निभावली होती. याचा एक पडद्यारागचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेजस्विनीचा बॅाडी डबल म्हणून उपयोग जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’मध्येही करण्यात आला आहे. याविषयीचा तिने किस्साही सांगितला आहे. ‘अथांग’च्या पडद्यावर जरी तेजस्विनी प्रत्यक्ष झळकली नसली तरी पडद्यामागे मात्र तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. या वेबसीरिजमधील काही दृश्यांना तिचा आवाजही लाभला आहे. याबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ‘एक कलाकार म्हणून वावरताना आपल्यावर फार जबाबदारी नसते. शुटिंग, डबिंग करायचे की आपले काम झाले. परंतु निर्माती म्हणून वावरताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कागदावर श्रीगणेशा लिहिण्याच्या प्रक्रियेपासून मी यात सहभागी होते आणि मी हे काम एन्जॅायही केले. अनेकांनी मला विचारले यात तू एखादी भूमिका का नाही केलीस, तर निर्माती म्हणून या भूमिकेला मला शंभर टक्के न्याय द्यायचा होता आणि अभिनय करून मला हे शक्य झाले नसते.

जाहिरात

तेजस्विनी पुढे सांगते, ‘मुळात यात मी पडद्यावर जरी दिसत नसले तरी पडद्यामागे मी अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. यात काही ठिकाणी मी आवाजही दिला आहे. त्यामुळे विविध भागांत मी काम केले आहे.’ अथांग’मध्ये तेजस्विनीने केतकी नारायणसाठी बॅाडी डबल म्हणून काम केले आहे.’

News18लोकमत
News18लोकमत

प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. यात संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप,भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  ‘अथांग’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात