मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'माझ्या जन्मासोबतच...'; बिग बॉस 16 च्या घरात अभिनेत्रीचं हृदयस्पर्शी रॅप, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

'माझ्या जन्मासोबतच...'; बिग बॉस 16 च्या घरात अभिनेत्रीचं हृदयस्पर्शी रॅप, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

सुंबुल तौकीर खान

सुंबुल तौकीर खान

'बिग बॉस 16' यंदाच्या सीझनमधील सर्वात तरुण स्पर्धक टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओनं सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 4 ऑक्टोबर : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा नवीन सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून यंदाच्या पर्वाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एकापेक्षा एक धमाकेदार स्पर्धकांनी यंदाच्या सीझनमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे 'बिग बॉस 16' चे स्पर्धक जोरदार चर्चेत आहे. अशातच यंदाच्या सीझनमधील सर्वात तरुण स्पर्धक टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओनं सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

सुंबुलची एक क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या वडिलांनी लिहिलेला रॅप बोलत आहे. मुलींवर लिहिलेला जोरदार रॅप आणि सुंबुलची दबंग शैली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. या हृदयस्पर्शी रॅपमध्ये देशात शतकानुशतके सुरू असलेल्या मुलीच्या जन्माचे दु:ख दाखवण्यात आले आहे. वुमन एम्पॉवरमेंटवर लिहिलेला हा अप्रतिम रॅप सुंबुलने ज्या आत्मविश्वासानं गायला याचं सगळीकडे कौतुक होत आहे.

हेही वाचा -  500 रुपयांसाठी धडपडणारी श्वेता तिवारी आज इतक्या कोटींची मालकीण, संपत्ती वाचून बसेल धक्का

सध्या सोशल मीडियावर सुंबुलचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. चाहते तिच्या साधेपणावर फिदा झाले आहेत. अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत तिच्यावर कौतुकांचा वर्षाव करताना दिसतायेत.

दरम्यान, मध्य प्रदेशातील कटनी येथे एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेली सुंबूल फक्त 19 वर्षांची आहे, ती बिग बॉस 16 मधील सर्वात तरुण स्पर्धक आहे. ती प्रसिद्ध टेलिव्हिजन कोरिओग्राफर हसन खान यांची मुलगी आहे. 'इमली' या मालिकेतून घराघरांत पोहचलेल्या सुंबुलने या सीझनमधील सर्वात जास्त फी घेतली असल्याचं समोर आलं आहे. सुंबुल प्रत्येक आठवड्यासाठी 12 लाख रुपये आकारत आहे. ती सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे.

First published:

Tags: Big boss, Social media, Tv actress, Video viral