टीव्ही जगत गाजवून, बिग बॉस 11ची (Bigg Boss 11) विजेती झालेल्या मराठमोळ्या शिल्पा शिंदेचं (Shilpa Shinde) नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. छोट्या पडद्यानंतर शिल्पा शिंदेंनं आता डिजिटल प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवला आहे. शिल्पा शिंदेची पौरषपूर (Paurashpur) ही वेब सीरिज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार आहे. यामध्ये राणी मीरावतीची भूमिका साकारत आहे.
शिल्पा शिंदेचं फॅन फॉलोईंग मोठं आहे. त्यामुळे तिला पुन्हा अभिनय करताना पाहणं ही तिच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असणार आहे.
पौरषपूरच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना मिस्ट्री आणि सस्पेन्स हा जॉनर एकत्र पाहायला मिळणार आहे. यामध्ये शिल्पा शिंदेचा लूक अतिशय वेगळा आहे.
आत्तापर्यंत शिल्पा शिंदेला निगेटिव्ह आणि कॉमेडी भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी बघितलं आहे. पण पहिल्यांदाच तिने एका राणीचा रोल केला आहे. टीझर रीलिज झाल्यानंतर मिलिंद सोमणच्या लूकचीही बरीच चर्चा झाली.
या वेब सीरिजमध्ये शिल्पा शिंदे अतिशय बोल्ड अवतारात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शिंदे गॅग्ज ऑफ फिल्मिस्तानमधून कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
गॅग्ज ऑफ फिल्मिस्तानमधून शिल्पाने काढता पाय घेतला. मेकर्ससोबत भांडण झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं समजतं.