तापसीनंतर आता रेणुका शहाणेंना वीज बिलाचा झटका, ट्विटरवरून व्यक्त केला राग

तापसीनंतर आता रेणुका शहाणेंना वीज बिलाचा झटका, ट्विटरवरून व्यक्त केला राग

आता देश हळूहळू अनलॉक होत आहे तेव्हा सर्वांसाठीच एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. ती म्हणजे वीज बिल. ज्याचा फटका समान्य जनतेपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जून : मागच्या काही महिन्यांपासून देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून अनेकजण घरीच आहेत. आता देश हळूहळू अनलॉक होत आहे तेव्हा सर्वांसाठीच एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. ती म्हणजे वीज बिल. ज्याचा फटका समान्य जनतेपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच बसला आहे. काल तापसी पन्नूनं तिच्या वीज बिलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सुद्धा त्यांच्या वीज बिलाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. यासोबतच त्यांनी ट्विटवर काही फोटो शेअर करत राग व्यक्त केला आहे.

रेणुका शहाणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करुन त्यांचं वीज खूपच जास्त आल्याची माहिती दिली आहे. रेणुका शहाणेंच वीज बिल पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. रेणुका शहाणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘मे महिन्यात माझे लाईट बिल 5510 रुपये होते. त्यानंतर जून महिन्याच 29,700रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल 18080 रुपये दाखवले आहे… पण माझे बिल 5510 रुपयांवरुन 18080 रुपये कसे झाले?’ असे त्यांनी प्रश्न विचारला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूलाही (Taapsee Pannu) असं भरमसाठ बिल आलं आहे. ते पाहून तिलाही शॉक बसला आहे. आपल्या सोशल मीडियावर तिनं आपल्या लाइट बिलचं स्क्रिनशॉट शेअर केलं आहे. यात तिने अदानी इलेक्ट्रिसिटीला टॅग केलं आहे. यासोबतच ज्या अपार्टमेंटमध्ये कुणीच राहत नाही, त्याच वीज बिलही असंच आल्याचं तिनं सांगितलं.

"आता हे त्या अपार्टमेंटचं बिल आहे, जिथं कुणीच राहत नाही. आठवड्यातून फक्त एकच वेळा तिथं फक्त साफसफाई केली जाते. आता हे अपार्टमेंट आम्हाला न सांगता दुसरं कुणी वापरत तर नाही ना याची चिंता मला लागली आहे. काय तुमच्यामुळेच आता हे आम्हाला समजलं असावं", असं तापसी म्हणाली.

First published: June 29, 2020, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading