मुंबई, 20 ऑगस्ट : उत्तम अभिनय आणि सौंदर्यानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी अशी छाप निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). अभिनयाशिवाय तिला फिटनेसमध्येही खूप रस आहे. ती फिटनेसविषयीही खूप जागरूक आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रिया तिचं फिटनेस वर्कआउट दाखवत असते. तंदुरुस्त राहण्यासाठी ती नियमित जिमला जाते. अनेकदा उमेश कामत, तिचा पतीही तिच्या बरोबर असतो. अशातच कायम सक्रिय असणाऱ्या प्रियानं नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या सकाळच्या फोटोनं चाहत्यांची मात्र सकाळ सुंदर झालीये. प्रिया बापटनं तिच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर एक फोटो शेअर केलाय. हा फोटो तीनं ‘मॉर्निंग मूड’ लिहित फोटो शेअर केलाय. फोटोमध्ये प्रिया एक छत्री घेऊन उभी असलेली दिसतेय. तिचा फोटो पाहून तिच्या चाहत्यांची मॉर्निंग कलरफुल झाली आहे. तिच्या या फोटोवर काही वेळातच कमेंट लाईक्स सुरु झाले आहेत. प्रिया कायमच तिच्या चाहत्यांसोबत तिचं रुटिन शेअर करत असते. त्यामुळे तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर चाहते नेहमीच खूप सारं प्रेम देत असतात.
अभिनय आणि फिटनेससोबत प्रिया तिच्या हटके फॅशनमुळेही चर्चेत असते. नेहमीच वेगळ्या लूकमध्ये ती फोटो पोस्ट करुन चाहत्यांना घायाळ करत असते. प्रियानं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. त्याचबरोबर ती हिंदी वेबसिरिजमध्येही झळकली आहे. त्यामुळे प्रियाचा चाहता वर्ग काही कमी नाही. तिनं तिच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, मला मराठी चित्रपट करायचा नाही, असा गैरसमज सध्या पसरला आहे, असं प्रिया सांगत असते, मला चांगल्या भूमिका करायच्या आहेत. खरं तर या चित्रपटानंतर मराठीत मला चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे चांगल्या भूमिकेची वाट पाहत आहे. असं प्रियानं सांगते.