मुंबई, 15 ऑक्टोबर : झी मराठी वाहिनीवर अगदी कमी कालावधीत लोकप्रिय झालेला कार्यक्रम म्हणजे 'बस बाई बस'. खास महिलांसाठी असलेल्या या कार्यक्रमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची हजेरी पहायला मिळाली आहे. या कार्यक्रमातून पाहुण्यांविषयी अनेक गोष्टी समोर येतात. सुबोध भावे प्रत्येक पाहुण्यांवर प्रश्नांचा भडिमार करत असतात. अशातच कार्यक्रमाच्या आगामी भागात अभिनेत्री प्रार्थना बेहरे पाहुणी म्हणून उपस्थिती लावणार आहे. याचे प्रोमो व्हिडीओही समोर आले आहेत.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर आगामी भागाचे काही प्रोमो व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये प्रार्थना अनेक वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलताना दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये प्रार्थनाने तिच्या हसण्याविषयीचा एक खास किस्सा शेअर केला. प्रार्थना म्हणाली, मी पहिला सिनेमा जेव्हा केला होता तेव्हा एक असिस्टंट होता. त्यामुळे सेटवर त्यांचं लक्ष नेहमी माझ्या कन्टिन्युटीवर असायचं. तो मला म्हणाला मॅम तुम्हाला माहितीये तुम्ही खूप छान दिसता. यावर प्रार्थना म्हणाली थॅंक्यू. पुढे तो म्हणाला मॅम तुम्ही तेवढंच घाण हसता. हे ऐकून सुबोध भावेनं विचारलं तो हे तुला तोंडावर म्हणाला. तर प्रार्थना म्हणते हो त्यानं हे मला तोंडावर म्हटलं.
View this post on Instagram
प्रार्थनानं या भागात तिच्या आई बाबांचाही एक किस्सा सांगितला. प्रार्थना म्हणाली, आई बाबा लग्नानंतर एक कॉमेडी सिनेमा पाहिला गेले. रोमॅन्टिक म्हणून गेले. मात्र आई एवढी हसली की बाबा म्हणाले तू बाहेर चल आता. हे ऐकून सगळेच हसायला लागले. याशिवाय प्रार्थनानं बडोदा आणि गुजरातचं खास कनेक्शनही सांगितलं.
दरम्यान, प्रार्थना मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून नेहा कामत म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news, Prarthana Behere, Zee Marathi