मुंबई, 17 ऑक्टोबर : अभिनेत्री प्रार्थना बेहरे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून नेहा कामत म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. नुकतंच प्रार्थनाने 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात प्रार्थनाने अनेक गोष्टींविषयी गप्पा मारल्या. याशिवाय काही जुन्या आठवणींनाही तिने उजाळा दिला.
प्रार्थनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थनानं तिचं एक टॅलेंट दाखवलं आहे. ती एका मिनिटात कशी रडते यांची एक झलक तिने बस बाईच्या मंचावर दाखवली. तिच्या या गोष्टीचं चाहत्यांनी कायमच कौतुक केलंय. मात्र या व्हिडीओमधे प्रार्थना म्हटली, मी जे रडते ते खरं रडते आणि ते तुमच्या पर्यंत पोहचतं.
View this post on Instagram
प्रार्थनाने या भागात तिच्या हसण्याचाही एक किस्सा सांगतिलेला पहायला मिळाला. प्रार्थना म्हणाली, मी पहिला सिनेमा जेव्हा केला होता तेव्हा एक असिस्टंट होता. त्यामुळे सेटवर त्यांचं लक्ष नेहमी माझ्या कन्टिन्युटीवर असायचं. तो मला म्हणाला मॅम तुम्हाला माहितीये तुम्ही खूप छान दिसता. यावर प्रार्थना म्हणाली थॅंक्यू. पुढे तो म्हणाला मॅम तुम्ही तेवढंच घाण हसता. हे ऐकून सुबोध भावेनं विचारलं तो हे तुला तोंडावर म्हणाला. तर प्रार्थना म्हणते हो त्यानं हे मला तोंडावर म्हटलं.
दरम्यान, झी मराठीवर प्रदर्शित होणारा बस बाई बस हा कार्यक्रम अल्वावधीत खूप लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला हजेरी लावत असतात. आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या मंडळींना कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.