मुंबई, 2 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीतून अनेक निधनाच्या बातम्या समोर येत आहे. अशातच आणखी एका कलाकाराचं निधन झाल्याची बातमी समोर आलीये. दिग्गज अभिनेत्री झरना दासच्या निधनाची बातमी समोर आली आहे. या बातमीने पुन्हा एकदा कलासृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्री झराना दासने वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी समोर येताच त्यांचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री झरना दास यांचं राहत्या घरी निधन झालं. अभिनेत्रीचे वृद्धपणामुळे निधन झाल्याचं, इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीमध्ये सांगण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांनी ओडिया चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल राज्य सरकारने त्यांना प्रतिष्टित जयदेव पुरस्कारही देण्यात आला होता. त्यांच्या जाण्याने ओडिया चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्विट करत त्यांच्या जाण्याचा शोक व्यक्त केला.
Saddened to know about the demise of legendary Odia actress Jharana Das. She will always be remembered for her outstanding contribution to Odia film industry. My deepest condolences to the family and her admirers.
— President of India (@rashtrapatibhvn) December 2, 2022
1945 मध्ये जन्मलेल्या झरना दास यांनी 60 च्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्री जगन्नाथ, नारी, आदिनामेघा, हिसबनिकस, पूजाफुला, अमदबता, मालाजन्हा आणि हीरा नेला यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्या चमकदार अभिनयासाठी अनेक प्रशंसा मिळाली.
दरम्यान, झदास यांनी ऑल इंडिया रेडिओ (AIR), कटक येथे बालकलाकार म्हणूनही काम केले होते. त्यांनी कटकमध्ये दूरदर्शनच्या सहाय्यक स्टेशन डायरेक्टर म्हणूनही काम केलं होतं. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांच्या चरित्रात्मक माहितीपटातील तिच्या दिग्दर्शनाचं अनेकांनी कौतुक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Death, Entertainment