बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री भूमि पेडणेकरचा आज वाढदिवस आहे. आज ती आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
भूमिला सुरुवातीपासूनचं अभिनयाची आवड होती. मात्र तिला पहिल्यांदा अभिनेत्री नव्हे तर असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर म्हणून यशराजमध्ये काम मिळालं होतं.
मात्र ज्यावेळी भूमिला आपला पहिला चित्रपट मिळाला होता, तेव्हा तिला यासाठी 25 किलो वजन वाढवावं लागलं होतं.
या चित्रपटातसुद्धा भूमि असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर होती. यासाठी तब्बल 100 मुलींचे ऑडीशन घेण्यात आले होते. मात्र त्यांना सीन समजले नव्हते. त्यावेळी या मुलींना भूमिने काही सीन करून दाखवले होते.
यावेळी भूमिने कास्टिंग डायरेक्टरचं मन जिंकल आणि या चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून तिची वर्णी लागली. मात्र तिला आपलं 25 किलो वजन वाढवावं लागल होतं.