जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Fu Baai Fu: 'जिथे असाल तिथे हसाल'; उमेश कामत आणि निर्मिती सावंत दिसणार नव्या भूमिकेत

Fu Baai Fu: 'जिथे असाल तिथे हसाल'; उमेश कामत आणि निर्मिती सावंत दिसणार नव्या भूमिकेत

फू बाई फू

फू बाई फू

‘फू बाई फू’ या कार्यक्रमानं संपूर्ण महाराष्टाला खळखळून हसवलं आहे. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांना हास्याची मेजवानी द्यायला सज्ज झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑक्टोबर : ‘फू बाई फू’ या कार्यक्रमानं संपूर्ण महाराष्टाला खळखळून हसवलं आहे. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांना हास्याची मेजवानी द्यायला सज्ज झाला आहे. तब्बल 9 वर्षांनी फू बाई फू हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय कार्यक्रम परत येतोय म्हटल्यावर प्रेक्षकांना तर एक सुखद धक्काच बसला आहे. पुन्हा एकदा कॉमेडीच्या हरहुन्नरी कलाकारांची विनोदी शैली पहायला मिळणार. ‘जिथे असाल तिथे हसाल’ ही संकल्पना घेऊन यंदा  ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री वैदेही परशुरामी सांभाळणार आहे. ती पहिल्यांदाच सूत्रसंचालनाची जबाबदारी पेलवताना दिसणार आहे.  या निमित्तानं वैदेही टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे.

जाहिरात

या कार्यक्रमात परिक्षणाची जबाबदारी लोकप्रिय अभिनेता उमेश कामत आणि कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत सांभाळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या नव्या आणि फ्रेश परिक्षकांच्या जोडीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याशिवाय यंदा कोण कोण हरहुन्नरी कलाकार कॉमेडीचा तडका लावणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, वैदेही परशुरामीच्या अँकरिंगसह “फु बाई फू” 3 नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता झी मराठीवर सुरू होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांचं टेंशन होणार खल्लास मनोरंजन होणार झकास.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात