Home /News /entertainment /

अखेर अभिनेता सिद्धार्थने मागितली सायना नेहवालची माफी; म्हणाला..

अखेर अभिनेता सिद्धार्थने मागितली सायना नेहवालची माफी; म्हणाला..

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सानिया नेहवालवर (Saina Nehwal) अश्लील शेरेबाजी केल्यानंतर अखेर अभिनेता सिद्धार्थने (Actor Siddharth) माफी मागितली आहे.

     मुंबई,12 जानेवारी-   भारताची स्टार बॅडमिंटनपटू सानिया नेहवालवर   (Saina Nehwal)   अश्लील शेरेबाजी केल्यानंतर अखेर अभिनेता सिद्धार्थने   (Actor Siddharth)  माफी मागितली आहे. मंगळवारी आपल्या ट्विटर हँडलवर एक मोठी पोस्ट लिहीत त्याने सायनाची जाहीर माफी   (Actor Siddharth apology tweet)   मागितली. सायनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत ट्विट केले होते. यानंतर अभिनेता सिद्धार्थने तिच्यावर टीका   (Actor Siddharth controversial tweet)   केली होती. या अश्लील टीकेनंतर सिद्धार्थला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. अगदी सायनाच्या वडिलांनीही  (Saina Nehwal Father’s rection)  सिद्धार्थला खडे बोल सुनावले होते. हे प्रकरण आणखी वाढून महिला आयोगापर्यंत पोहोचल्यानंतर अखेर सिद्धार्थने माघार घेतली आहे. सिद्धार्थ आपल्या माफीनाम्यात  (Actor Siddharth tweet)  म्हणतो, “डिअर सायना, तुझ्या ट्विटचे उत्तर म्हणून मी केलेल्या अश्लील विनोदाबाबत तुझी माफी मागतो. आपले विचार कितीतरी बाबतीत वेगळे असले, तरी रागात किंवा निराशेच्या भरातही मी अशा शब्दांचा वापर करायला नको होता. माझ्याकडे त्याहून जास्त सभ्यता आहे. मी केलेल्या विनोदाबाबत बोलायचे झाल्यास, जर एखादा विनोद समजावून सांगावा लागत असेल, तर तो नक्कीच चांगला नाही. त्या विनोदाबाबत मी तुझी माफी मागतो.” तू नेहमीच माझ्यासाठी चॅम्पियन असशील- सिद्धार्थ आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितो, “सर्वच स्तरांतून माझ्यावर टीका होत असल्यामुळे मला हे स्पष्ट करावं लागत आहे, की मी केलेल्या ट्विटमधून मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता. मी नेहमीच स्त्रीवादाचे समर्थन केले आहे. एक स्त्री म्हणून तुझ्यावर टिप्पणी करण्याचा माझा हेतू नव्हता. आशा आहे, की तुम्ही माझा हा माफीनामा स्वीकाराल; आणि आपण हे सगळं विसरून पुढे जाऊ. तू नेहमीच माझ्यासाठी चॅम्पियन आहेस आणि असशील.” काय आहे प्रकरण- गेल्या आठवड्यात सायनाने पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटीसंबंधी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये (Saina Nehwal tweet on Punjab incident) सायनाने म्हटले होते, “जर पंतप्रधानांच्या सुरक्षेतच त्रुटी निर्माण होत असेल, तर कोणताही देश स्वतः सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. या घडलेल्या प्रकाराचा मी निषेध करते.” यावर सिद्धार्थने सायना नेहवालवर अश्लील शेरेबाजी करणारे ट्विट (Actor Siddharth tweet on Saina) केले होते. या ट्विटवर प्रतिक्रिया देत सायना म्हणाली होती, की एक अभिनेता म्हणून मला तो आवडत होता, मात्र त्याने असं बोलायला नको होतं. तो योग्य शब्दांमध्ये त्याचं म्हणणं मांडू शकत होता. महिला आयोगापर्यंत पोहोचले प्रकरण दरम्यान, सिद्धार्थच्या विवादास्पद ट्विटनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून टीका (Actor Siddharth trolled) केली जात होती. त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब महिला आयोगापर्यंत पोहोचली. यानंतर मात्र सिद्धार्थने ट्विटरवर आपला माफीनामा पोस्ट करत सायनाची जाहीर माफी मागितली आहे.
    First published:

    Tags: Entertainment, Saina Nehwal ., South indian actor

    पुढील बातम्या