संदीप नाहर पत्नीमुळं होता त्रस्त; अभिनेत्याला घरी परतायला वाटायची भीती

संदीप नाहर पत्नीमुळं होता त्रस्त; अभिनेत्याला घरी परतायला वाटायची भीती

अभिनेत्यानं पत्नी देत असलेल्या मानसिक त्रासाला वैतागून आत्महत्या केली. पाहा सुसाईड नोटमध्ये काय म्हणाला पत्नीबद्दल...

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संदीप नाहर यानं आत्महत्या केली आहे. मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात संदीपचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूमुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आत्महत्येपूर्वी संदीपनं फेसबुकवर एक व्हिडिओ आणि सुसाइड नोट शेअर केली. लक्षवेधी बाब म्हणजे या अंतिम पत्रात त्यानं आपल्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार धरलं आहे.

काम संपल्यानंतर त्याला आपल्या घरी जायला भीती वाटायची. तो गेल्या अनेक महिन्यांपासून नैराश्येत होता. अखेर पत्नीच्या संशयी स्वभावाला वैतागून त्यानं आत्महत्या केली असं या सुसाईड नोट्समध्ये लिहिलं आहे.

अवश्य पाहा - सुशांतसह काम केलेला अभिनेता संदीप नाहरची आत्महत्या; फेसबुकवर टाकली सुसाइड नोट

हे पाहा संदीपनं लिहिलेलं संपूर्ण पत्र

“आता जगण्याची इच्छा होत नाही आहे. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणं भीत्रेपणाचं लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचं होतं. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा…माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतलं नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको शिघ्रकोपी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळं नॉर्मल वाटतं… पण माझ्यासाठी हे सामान्य नाही…मुंबईत अनेक वर्षांपासून आहे…खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो. आत्महत्या मी खूप आधीच केली असती, पण मी स्वतःला वेळ दिला…सर्व ठिक होईल असं वाटलं…पण रोजच भांडणं होतात…या चक्रव्युहात अडकलोय..बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा रस्ता नाही…आता मला हे पाऊल आनंदाने उचलावं लागेल…इथल्या जीवनात नरक बघितला…इथून निघून गेल्यानंतर काय होईल माहिती नाही पण जे काही होईल मी त्याचा सामना करेल”.

Published by: Mandar Gurav
First published: February 16, 2021, 9:39 AM IST

ताज्या बातम्या