मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी अभिनेत्याला अटक; पत्नीवर अत्याचार... भावाला मारण्याचा प्रयत्न

कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी अभिनेत्याला अटक; पत्नीवर अत्याचार... भावाला मारण्याचा प्रयत्न

 अभिनेता ऑरलँडो ब्राउन

अभिनेता ऑरलँडो ब्राउन

घरगुती हिंसाराच्या अनेक बातम्या समोर येत असतात. सामान्यांपासून मोठमोठ्या कलाकारांच्या घरातून हिंसाचाराच्या बातम्या उघडकीस येतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 डिसेंबर : घरगुती हिंसाराच्या अनेक बातम्या समोर येत असतात. सामान्यांपासून मोठमोठ्या कलाकारांच्या घरातून हिंसाचाराच्या बातम्या उघडकीस येतात. अशातच आणि एका प्रसिद्ध कलाकाराच्या घरातून घरगुती हिंसाचाराची बातमी समोर आली असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हॉलिवूड अभिनेता ऑरलँडो ब्राउन याला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पत्नी आणि भावासोबत हिंसाचार केल्याचे आरोप आहेत.

ऑरलॅंडो डिस्ने शो दॅट्स सो रावेनसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या अटकेनंतर काही लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काही जण त्याला पत्नीवर हल्ला आणि बलात्कारासाठी टार्गेट करत आहेत. टीएमजीच्या अहवालानुसार, ऑरलॅंडो ब्राउन  गेल्या काही महिन्यांपासून ओहायोमध्ये राहत होता.

हेही वाचा -  KGF अभिनेता यशचं बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला बॉलिवूडचा अपमान...

ओरलँडोचा भाऊ मॅथ्यू याने पोलिसांशी संवाद साधताना दावा केला की, त्याने ओरलँडोला केवळ आपल्या घरात राहण्याची परवानगी दिली जेणेकरून त्याला रस्त्यावर राहावे लागू नये. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो सतत विचित्र वागत होता. अशा परिस्थितीत ऑरलँडोचे काय झाले हे मॅथ्यूलाही समजू शकले नाही.

मॅथ्यूच्या म्हणण्यानुसार, भाऊ ओरलँडोवरही त्याच्या पत्नीने बलात्काराचा आरोप केला होता, ज्यावर अभिनेता इतका संतापला की त्याने तिला हातोडा आणि चाकूने मारण्यास पुढे केले. पण, तो मारू शकला नाही आणि नंतर शस्त्रे परत ठेवली. याआधी 2018 मध्येही ऑरलँडो चर्चेत आला होता. त्याला या वर्षात अनेकवेळा वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिसांनी अटक केली होती. चोरीपासून ते ड्रग्ज बाळगण्यापर्यंत अनेक गंभीर आरोप अभिनेत्यावर लावण्यात आले आहेत.

दरम्यान, अमेरिकन गायक आणि रॅपर ओरलँडो फ्रँकी ब्राउन, जो डिस्ने मालिका ' दॅट्स सो रेवेन ' मधील एडी थॉमसच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. ब्राउनने 1995 मध्ये मेजर पायने या चित्रपटात कॅडेट केविन "टायगर" डूनच्या भूमिकेत अभिनयात पदार्पण केले.  1996 ते 2007 पर्यंत, ब्राउनने फॅमिली मॅटर्स, दॅट्स सो रेवेन, द प्राउड फॅमिली, द वेन ब्रदर्स, सिस्टर, सिस्टर, द जेमी फॉक्स शो, फिलमोर यांसारख्या शोमध्ये प्रमुख भूमिका केल्या.

First published:

Tags: Hollywood, Violance