bolमुंबई, 17 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) धर्मा प्रॉडक्शन्सच्या (Dharma Productions) बहुचर्चित ‘दोस्ताना-2’ मधून (Dostana 2) वगळण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर अभिनेत्री कंगना रणोत (Kangana Ranaut) कार्तिकच्या बाजूने मैदानात उतरली असून कंगनाने एकामागून एक ट्वीट करत पुन्हा एकदा करण जोहर (Karan Johar) आणि ‘नेपोटिझम गँग’ या मुद्द्यावरून बॉलिवूडमधील अनेकांवर निशाणा साधला आहे. कार्तिकला एकटे सोडा, सुशांतप्रमाणे त्याच्याही पाठीमागे लागू नका आणि त्याला फासावर लटकवण्यासाठी भाग पाडू नका, असे म्हणत कंगनाने जोरदार हल्लाबोल केला. कंगना रणौत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर (Sushant Singh Rajput Death Case) तिने करण जोहर इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देत नाही आणि त्रास देतो, असे अनेक थेट आरोप केले होते. त्यामुळे आताही कार्तिक आर्यनला धर्मा प्रॉडक्शनमधून बाहेर काढल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर कंगनाने पुन्हा आक्रमक रुप घेत करण जोहरवर टीका केली.
Kartik has come this far on his own, on his own he will continue to do so, only request to papa jo and his nepo gang club is please leave him alone like Shushant don’t go after him and force him to hang himself. Leave him alone you vultures, get lost chindi nepos... https://t.co/VJioWHk38i
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 16, 2021
‘कार्तिक स्वत:च्या हिमतीवर इथंपर्यंत पोहचला आहे आणि पुढेही तो अजून स्वत:च्या हिमतीवर काम करत राहील. पापा जो (करण जोहर) आणि त्यांची नेपोटिझम गँग यांना एवढेच सांगते की, त्याला तरी आता एकटे सोडा. सुशांतच्या जसे मागे लागला होतात, तसे त्याच्या मागे पडू नका आणि त्याला फासावर जाण्यास भाग पाडू नका. गिधाडांनो त्याला एकटे सोडा’, असे कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Kartik no need to be scared of these chillars.... after doing nasty articles and releasing announcements blaming only your attitude for fall out this moron wants to maintain dignified silence. They spread same stories of drug addiction and unprofessional behaviour for SSR also
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 16, 2021
तीने आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘कार्तिकने या चिल्लरांना घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. घाणेरडे लेख लिहून आणि घोषणा देवून केवळ मनोबल खच्चीकरण करण्याचे काम चाललं असून त्याबाबत मौन पाळायचं नाटक यांनी लावलंय. या लोकांनी यापूर्वी सुशांतसाठी तो अमली पदार्थांमध्ये कसा गुरफटला आहे आणि त्याच्या व्यसनाधीनतेची कथा रचली होती.’
आणखी एक ट्वीट करत कंगना असं म्हणाली आहे की, ‘तुझ्या सोबत आम्ही नेहमी आहोत हे लक्षात ठेव. ज्यांनी तुला बनवलं नाही, ते तुला बरबादही करू शकत नाहीत, आज तुला फारच एकटेपणा जाणवत असेल, त्रास होत असेल. मात्र असे वाटून घेण्याची अजिबात गरज नाही. या नाटक कंपनीविषयी सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपल्या वृत्तीवर विश्वास ठेवा आणि शिस्तबद्ध राहा.’ तर धर्मा प्रॉडक्शनकडून याबाबत मौन बाळगण्यात आले असून आम्ही सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगण्यासाठी त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे.