प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन अभिनयासोबत राजकारणातही खूप सक्रिय आहे. ते नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच सध्या त्यांची मुलगी रिवा किशनही चर्चेत आली आहे.
रवी किशन यांची मुलगी रिवा किशनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते.
रिवानं अगदी लहान वयातच अभिनेत्री व्हायचं ठरवलं होतं. त्यामुळे तिनं नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनय नाटकाच्या गटातून एक वर्ष प्रशिक्षण घेतलं.
'सब कुशल मंगल' हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर जास्त कमाल करू शकला नाही. मात्र रिवाची आणखी मेहनत सुरू आहे.