मुंबई, 12 जुलै : अभिनेता आदिश वैद्य आणि रेवती लेले यांची लव्हस्टोरी सर्वपरिचित आहे. ते दोघे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असतात. अनेकदा दोघेजण एकत्र वेळ घालवताना, सुट्ट्यांचा एकत्र आनंद घेताना दिसतात. तसेच त्या दोघांनी बऱ्याच मालिकांमधून एकत्र काम देखील केलं आहे. (Adish vaidya meet gf Revati lele)सध्या ही जोडी कामात व्यस्त असून आपापल्या मालिकांचे शूट करत आहेत. अभिनेत्री रेवती लेले सध्या स्टार प्रवाहवरील ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत काम करत आहे तर आदिश वैद्य सब टीव्ही वरती नव्यानेच सुरु झालेल्या ‘पुष्पा इम्पॉसिबल’ या मालिकेत काम करताना दिसतोय. आदिश आणि रेवती दोघेही त्यांच्या लव्हस्टोरीमुळे चर्चेत असतात.आताही तसंच काहीसं घडलय. आदिश आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क तिच्या सेटवर गेला आहे. नुकतीच आदिशने रेवती लेले काम करत असलेल्या लग्नाची बेडी या मालिकेच्या सेटला भेट दिली. तिथे या कपलची ग्रेट भेट झाली. आदिश आणि रेवतीचा लग्नाची बेडी या मालिकेच्या सेटवरचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे आदिशची तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हेही वाचा - कॉफीचा मग हातात घेऊन सहकलाकारांसह थिरकली प्रार्थना बेहरे; Coffee Ani Barach Kahi म्हणत शेअर केला VIDEO काही दिवसांपूर्वीच आदिश आणि रेवती उदयपूरला सुट्टयांचा आनंद घेताना दिसले होते. दोघेही एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसले होते. त्या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील आनंदी होतात. बऱ्याचदा त्या दोघांना ‘लग्न कधी करताय?’ असा प्रश्न चाहते विचारतात.
आदीशने आतापर्यंत ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘झिंदगी नॉट आउट’, ‘गुम है किसीके प्यार में’, ‘नागीन’, ‘बॅरिस्टर बाबू’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. तसेच तो बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये सहभागी झाला होता. तर रेवतीने ‘स्वामीनी’, ‘आपकी नजरो ने समझा’ या मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत. सध्या दोघेही आपापल्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.