मुंबई, 21 सप्टेंबर : स्वप्नं माणसाला जगायला शिकवतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात. अशाच स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा अबलख या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आनंद शिवाजी चव्हाण दिग्दर्शित या सिनेमात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘मस्का’ सिनेमानंतर अनिकेत आणि प्रार्थनाचा हा दुसरा सिनेमा आहे. आयुष्य हा एक प्रवास असून या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे. असा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे.या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना योग्य प्रकारे तोंड देऊन प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही या सिनेमात मांडण्यात आलं आहे. ऑक्टोबरपासून या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. मैत्री, प्रेम आणि आयुष्यावर आधारलेल्या अनेक संकल्पनांना विविध पद्धतीने मांडणाऱ्या या सिनेमाची निर्मिती श्री तुळजाभवानी प्रसन्न फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे. अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा यांचा साखरपुडा तर झाला. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती त्यांच्या लग्नाच्या तारखेची. पण आता त्या दोघांचा एकत्र असलेल्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. ‘हृदयात वाजे समथिंग’ सिनेमाचा ट्रेलर बाहेर आलाय. त्यात या दोघांबरोबर महत्त्वाची भूमिका आहे अशोक सराफ यांची. सिनेमाचे दिग्दर्शक आहेत प्रवीण कारळे. त्यांचं अशोकमामांबरोबर काम करण्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं. ते सांगतात, ’ प्रेमात पडल्यानंतरच्या धमाल गंमती-जंमतीना अशोकमामांच्या कॉमिक टाइमिंगमुळे रंगायला खूप मदत झाली आणि सिनेमा खूप मनोरंजक झाला आहे. ’ स्नेहा-अनिकेतचा साखरपुडा झालाय. स्नेहानं सांगितलं, ‘हे काही आमचं लव्ह मॅरेज नाही, तर अॅरेंज मॅरेज आहे. जूनमध्ये हे लग्न ठरलं. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकाच सोसायटीत राहतात.’ PHOTOS : मॅटवरची कुस्ती जिंकण्यासाठी राणादाची नवी खेळी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.