Home /News /entertainment /

राम गोपाल वर्मांच्या आगामी चित्रपटात अभिषेक बच्चन

राम गोपाल वर्मांच्या आगामी चित्रपटात अभिषेक बच्चन

जे.पी .दत्ताच्या 'पलटन' नावाच्या युद्धावर बेतलेल्या सिनेमात तो काम करत असल्याची चर्चा होती. आणि आता तो लवकरच राम गोपाल वर्माच्या सिनेमातही काम करणार आहे अशी चर्चा आहे.

21जून:अभिषेक बच्चन लवकरच काही सिनेमे करत असल्याचं कळतंय. जे.पी .दत्ताच्या 'पलटन' नावाच्या युद्धावर बेतलेल्या सिनेमात तो काम करत असल्याची चर्चा होती. आणि आता तो लवकरच राम गोपाल वर्माच्या सिनेमातही काम करणार आहे अशी चर्चा आहे. राम गोपाल वर्मा आता एक क्राइम ड्रामा बनवणारआहे. या सिनेमात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.'डेक्कन क्रॉनिकल'च्या एका वृत्तानुसार या चित्रपटाचं नाव असेल 'सनक' आणि हा चित्रपट एन्काउन्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माच्या आयुष्यावर बेतला असेल. पण जेव्हा रामूला या सिनेमाबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यानं ही गोष्ट सरळ नाकारली, 'हा चित्रपट पूर्ण कल्पित असून त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसेल'. रामूनं सांगितलं की, अजूनही चित्रपटाची कथा लिहून पूर्ण झालेली नाही आणि सिनेमाचं नाव काय असेल याबाबत त्यानं मौन पाळलंय. पण एक मात्र नक्की अभिषेक या चित्रपटात काम करणार आहे आणि एका पोलीस आॅफिसरची भूमिका निभावणार आहे. याआधी त्याची धुममधल्यी पोलिसांची भूमिका प्रचंड गाजली होती. वर्मांसोबत काम करण्याची ही त्याची दुसरी वेळ .या आधी 'सरकार' आणि 'सरकार राज' या दोन राजकीय चित्रपटांमध्ये त्याने काम केलं होतं. आता बघू अभिषेकची पोलिसाची भूमिका गाजते की आपटते.
First published:

Tags: Ram gopal varma

पुढील बातम्या