'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट; 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार आगमन
रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या मालिकेमध्ये वेगळं वळण येणार आहे. 'तनुजा भारद्वाज' या नव्या पात्राची मालिकेमध्ये एन्ट्री होणार आहे. आता तिच्या एन्ट्रीमुळे कार्तिक आणि दीपाच्या आयुष्यात नेमके काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई,13 ऑक्टोबर: स्टार प्रवाह (Star Pravah)वरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या सीरिअलमध्ये अनेक ट्विस्ट येत आहेत. उत्तम कथा, योग्य कास्टिंग यामुळे या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. आता ही मालिका आणखी उत्कंठावर्धक होणार आहे. या मालिकेमध्ये लोकप्रिय अभिनेत्री 'अभिज्ञा भावे'ची (Abhidnya Bhave) एन्ट्री होणार आहे. 'तनुजा भारद्वाज' असं तिच्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. तिच्या येण्यामुळे कथानकामध्ये अनेक बदल होणार आहेत.
मालिकेतलं एक महत्वाचं पात्र म्हणजे कार्तिक. कार्तिक आणि तनुजाची कॉलेजपासूनची मैत्री असते. पण कॉलेजनंतर थेट आता त्यांची भेट होते. असं दाखवण्यात आलं आहे. आता तनुजा बनून येणाऱ्या अभिज्ञा भावेमुळे मालिकेत अजून कोणकोतणते ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.सौंदर्याला काळ्या रंगाचा एवढा राग का? याचा छडा दीपा आणि कार्तिक लावत आहेत. आता त्यात तनुजा भारद्वाजची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे या प्रश्नांची त्यांना उत्तरं मिळणार की, त्यांच्या आयुष्यात वेगळी काही वळणं येणार हे लवकरच कळेल.
अभिनेत्री अभिज्ञा भावेनी आजपर्यंत अनेक हिंदी, मराठी सीरिअल्समध्ये काम केलं आहे. तुला पाहते रे, प्यार की ये एक कहानी, लगोरी, लव्ह यू जिंदगी, खुलता कळी खुलेना अशा तिच्या गाजलेल्या सीरिअल्स आहेत. अभिज्ञाने काही नाटकांमध्येही उत्तम अभिनय केला आहे.