मुंबई, 15 फेब्रुवारी- ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ यासारखेएकाहून एक सरस चित्रपट देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक (Filmmaker) आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांचा आज 58वा वाढदिवस ( birthday ) आहे. कोल्हापूर (Kolhapur ) येथे त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. आशुतोष यांच्या वडिलांचेनाव अशोक तर आईचे नाव किशोरी गोवारीकर आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि अभिनेता (Actor) म्हणून आशुतोष यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे चित्रपटप्रेक्षक ( audiences ) आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरतात. त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. 1998-99 मध्ये त्यांनी सीआयडीमध्ये काम केले. याशिवायअभिनेता शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) ‘सर्कस’ मालिकेमध्ये ही त्यांनी काम केलंय. आशुतोष नेहमी चांगल्या कामावर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या चित्रपटांचीसंख्या कमी असेल, पण ते चित्रपट तयार करण्यासाठी खूप मेहनतघेतात. चला तर मग आज आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याकाही सर्वोत्तम चित्रपटांबद्दल. ‘जोधा अकबर’ हा ऐतिहासिक रोमँटिक चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी लिहिला होता. याचित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांनीच केली होती. या चित्रपटात हृतिक रोशनआणि ऐश्वर्या राय बच्चन प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीयपुरस्कार मिळाले. तसंच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कारमिळाला. याशिवाय, अभिनेता हृतिक रोशन याला घेऊन आशुतोष यांनी‘मोहनजोदडो’ हा चित्रपट केला. मात्र, या चित्रपटाला समीक्षकआणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत ‘स्वदेस’ हा चित्रपट आशुतोष गोवारीकरांनी केला. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या याचित्रपटात शाहरुख खानने मोहन भार्गव या एनआरआयची भूमिका साकारली होती. आशुतोषयांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि पटकथाही लिहिली होती. या चित्रपटालासर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. तर,अभिनेता आमीर खान याच्या सोबतचा ‘लगान’हा आशुतोष गोवारीकरांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.या चित्रपटाला ‘अकॅडमी अवॉर्ड फॉर बेस्ट फॉरेन लॅग्वेज’फिल्म पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. या चित्रपटालासमीक्षकांसोबतच प्रेक्षकांचंही भरभरून प्रेम मिळालं. हा चित्रपट प्रचंड गाजला. जुलुमी ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या भारतातील एका खेडुतांची ही कथा होती. (हे वाचा: अभिनेत्री मधुबाला यांच्या 96वर्षीय बहिणीला सुनेनं काढलं घराबाहेर, ही झाली अवस्था ) मानिनी चॅटर्जीच्या ‘डू अँड डाय: द चटगाव’ या पुस्तकावर आधारित, ‘खेले हमजी जान से’ या चित्रपटाचं आशुतोष यांनी दिग्दर्शन केलं होतं,त्याचं खूप कौतुक झालं. या चित्रपटाची समीक्षकांनी खूपच प्रशंसाकेली. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. अभिषेक बच्चन,दीपिका पदुकोण आणि सिकंदर खेर यांची प्रमुख भूमिका या चित्रपटातहोती.आशुतोष गोवारीकरांनी आतापर्यंतअनेक चांगले सिनेमे त्यांच्या चाहत्यांना, चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यामुळेत्यांच्या नावाला एक वेगळं वलय आल्याचं पाहायला मिळतंय. आज त्यांचा वाढदिवस असूनत्यानिमित्त त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी असेच चित्रपट द्यावेत अशी रसिकांची अपेक्षा आहे. त्यांना वाढदिवसाच्या अनेकानेकशुभेच्छा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







