मनोरंजन

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

VIDEO: दिवाळीत करा ‘आशेची रोषणाई’ रितेश जेनेलियाने दिला संदेश

VIDEO: दिवाळीत करा ‘आशेची रोषणाई’ रितेश जेनेलियाने दिला संदेश

दिवाळीनिमित्त अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया डिसुजा देशमुख (Genelia D'souza - Deshmukh) यांनी आशेची रोषणाई या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून अतिशय सुंदर संदेश दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर: लॉकडाऊन (Lockdown) आणि कोरोना (Corona)मुळे निर्माण झालेली बेरोजगारी, लोकांमधील निरुत्साह यामुळे दिवाळी जवळ येऊन ठेपली तरी उत्साह वाटत नाही. आपल्यापैकी अनेक जणांची अशीच अवस्था आहे. पण या दिवाळीला जे आपल्याकडे आहे ते इतरांनाही द्या, कोणाच्यातरी आयुष्यात आनंद फुलवा अशी संकल्पना साकारत अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजा देशमुख (Genelia D'souza - Deshmukh) यांनी एक शॉर्ट फिल्म बनवली आहे.

आशेची रोषणाई

'आशेची रोषणाई' असं या शॉर्टफिल्मचं नाव आहे. दिवाळीच्या काळात कोणाच्या तरी आयुष्यात नव्या आशेची रोषणाई करा असा सुंदर संदेश या शॉर्टफिल्ममधून देण्यात आला आहे. महेश लिमये (Mahesh Limaye) या लघुपटाचे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर आहेत. तर पुनीत बालन यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. क्षितिज पटवर्धनने अतिशय उत्तम शब्दांमध्ये ही लघुकथा पडद्यावर मांडली आहे. अजय अतुल (Ajay Atul) यांचं श्रवणीय पार्श्वसंगीत आणि रितेश जेनेनियाचा विशेष सहभाग यामुळे या शॉर्टफिल्मचं वजन वाढतं.

स्वत: जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर, आशेची रोषणाई, आपला आनंद दुसऱ्यांना वाटून तो द्विगुणित करता येतो. यंदाची दिवाळी गरजूंना मदत करुन साजरी करुया असं छानसं कॅप्शनही दिलं आहे. आशेची रोषणाई ही शॉर्टफिल्म यूट्यूबवरही उपलब्ध आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 8, 2020, 11:33 PM IST

ताज्या बातम्या