<strong>मुंबई.</strong> आमिर खानची (Aamir Khan) मुलगी (Daughter) इरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर (Social Media) बरीच सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपूर्वी डिप्रेशनबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ती खूप चर्चेत होती. या मुद्द्यावर मोकळेपणाने बोलल्याबद्दल तिचं खूप कौतुक केलं जात आहे. आता इराने काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो हेलोवीनच्या (Halloween) निमित्ताने शेअर केले आहेत. ज्यात तिने खूप भीतीदायक मेकअप केला आहे. इराने सांगितले की मित्र-मैत्रिणींना घाबरवण्याची इच्छा होती, मात्र कोरोनामुळे हा प्लान रद्द झाला आहे. (Photo Credit- @khan.ira/Instagram)
इरा खानने इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने भीतीदायक मेकअप केला आहे. फोटोमध्ये दिसतंय की तिने चेहऱ्याच्या एका बाजूला मेकअप केला आहे. (Photo Credit- @khan.ira/Instagram)
इराने हेलोवीनसाठी हा भीतीदायक मेकअप केला असून सोबत काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोंमध्ये इरा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत मजा करताना दिसत आहे. (Photo Credit- @khan.ira/Instagram)
इरा या फोटोंमध्ये खूप सुंदर आणि स्टायलिस दिसत आहे. यावेळी इराने आपल्या हेलोवीनचा प्लानही शेअर केला आहे. (Photo Credit- @khan.ira/Instagram)
या फोटोंसोबत इराने लिहिलं आहे की, - भारतात हेलोवीन खूप मोठी गोष्ट नाही, पण म्हणून काय झालं? सेलिब्रेट करायला आणि ड्रेसअप करायला कोणतंही निमित्त चालतं. . (Photo Credit- @khan.ira/Instagram)
तिने पुढे लिहिलं की, मी याबाबत ट्रिक आणि ट्रीटचा विचार करीत होते आणि मी माझ्या बिल्डिंगच्या मुलांना घाबरवण्याचाही विचार केला होता मात्र..कोरोना…यासाठी आम्ही घरात हेलोवीन साजरा केला. किती भीतीदायक आहे ना.. Happy Halloween'. (Photo Credit- @khan.ira/Instagram)