मुंबई, 16 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू होऊन 2 वर्ष झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड दोन गटांमध्ये विभागलं गेलं. सुशांतला न्याय देण्याची मोहीमही सोशल मीडियावर राबवली गेली. यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी सुशांतच्या मृत्यूचा तपास केला. आता आमिर खानचा भाऊ फैसल खानने सुशांतच्या मृत्यूबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुशांत सिंह राजपूतचं 14 जून 2020 ला मुंबईच्या बांद्र्यातल्या निवासस्थानी निधन झालं. पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये सुशांतचा मृतदेह आढळला होता. ‘मला माहिती आहे त्याची हत्या करण्यात आली. ही केस कशी सॉल्व्ह होईल, हे काळच सांगेल,’ असं आमिर खानचा भाऊ फैसल खान टाईम्स नाऊ नवभारतशी बोलताना म्हणाला. ‘अनेक तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. अनेकवेळा सत्य समोर येत नाही. सत्य समोर यावं, यासाठी मी प्रार्थना करतो,’ अशी प्रतिक्रिया फैसलने दिली. याआधीही आपलाच भाऊ आमिर खानवर केलेल्या आरोपांमुळेही फैसल चर्चेत आला होता. सुशांत सिंह राजपूतची बहीण मीतू सिंहने रणबीर कपूरच्या ब्रम्हास्त्र चित्रपटावर टीका केली होती. सुशांतचं ब्रम्हास्त्र बॉलिवूड उद्ध्वस्त करेल. बॉलिवूडला कायमच जनतेवर राज्य करायचं असतं, असं मीतू सिंह म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.