आई कुठे काय करते: अरुंधती आणि अनिरुद्धचा घटस्फोट होणार? प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला

स्टार प्रवाह(Star Pravah)वरील आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे.

स्टार प्रवाह(Star Pravah)वरील आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे.

  • Share this:
    मुंबई, 02, ऑक्टोबर: मराठी मालिकांमध्ये सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. स्टार प्रवाह(Star Pravah)वरील आई कुठे काय करते. ही अशीच एक मालिका. आई कुठे काय करते? (Aai Kuthe kay karte) ही एका सामान्य गृहिणीचा कथा आहे. घरातल्या आईला ज्याप्रमाणे सर्वांचं सर्व काही करावं लागतं पण ती नेहमी घरासाठीच काम करत असल्यामुळे तिचा या कामाचं कधीच श्रेय मिळत नाही. हाच विषय महत्वाचा विषय या मालिकेतून दाखवण्यात आला आहे. अतिशय कमी वेळात ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आई कुठे काय करते ही मालिका सध्या अत्यंत उत्कंठावर्धक वळणावरती आली आहे. अनिरुद्ध आणि संजनाबद्दलची वस्तूस्थिती समजल्यानंतर अरुंधतीने स्वत:ला वेळ द्यायचा असं ठरवलं आहे. घरातले सगळेच अरुंधतीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात. शेखरही अरुंधतीला समजावतो. "कोणत्याही परिस्थितीत अनिरुद्धला घटस्फोट देऊ नका आणि दिलात तर चांगली पोटगी मागा" असा सल्ला शेखरने अरुंधतीला आहे. शेअर स्वत: संजना हे सगळं फोनवरुन सांगतो. संजना आणि अनिरुद्ध शेअरचा हा सल्ला ऐकून चांगलेच चक्रावून जातात.
    आता अनिरुद्ध आणि संजनाबद्दल समजल्यावर आई, अप्पा नक्की काय पाऊल उचलणार ? अरुंधती खरंच अनिरुद्धला घटस्फोट देणार का? की संजनाच्या जाळ्यातून अनिरुद्धला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार ? याचा उलगडा काही दिवसातच होणार आहे. कलाकारांचे उत्तम अभिनय, खुसखुशीत संवाद आणि उत्तम कथा या सर्व बाबींमुळे मालिकेतील उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published: