मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

महात्मा गांधींच्या आयुष्यावर बनणार वेब सीरिज, प्रतीक गांधी साकारणार बापूंची भूमिका

महात्मा गांधींच्या आयुष्यावर बनणार वेब सीरिज, प्रतीक गांधी साकारणार बापूंची भूमिका

अप्लॉज एंटरटेनमेंटनं (Applause Entertainment) त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांचा काळ आणि जीवनाच्या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य अशी या नव्या वेब सीरिजची संकल्पना (Series On Mahatma Gandhi) आहे.

अप्लॉज एंटरटेनमेंटनं (Applause Entertainment) त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांचा काळ आणि जीवनाच्या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य अशी या नव्या वेब सीरिजची संकल्पना (Series On Mahatma Gandhi) आहे.

अप्लॉज एंटरटेनमेंटनं (Applause Entertainment) त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांचा काळ आणि जीवनाच्या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य अशी या नव्या वेब सीरिजची संकल्पना (Series On Mahatma Gandhi) आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 19 मे-   राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांचं तत्वज्ञान,आयुष्य आणि त्यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेबद्दलचं रहस्य आजही तितकंच कायम आहे. नथुरामचे समर्थक आणि कट्टर विरोधक यांच्यात अनेकदा टोकाचे वादही होताना पाहायला मिळतात. आज (19 मे) नथुराम गोडसेची जयंती आहे. एकीकडे महेश मांजरेकर यांनी नथुराम गोडसेवरील चित्रपटाची घोषणा केल्यानंतर त्यावरही भरपूर वाद झाले होते. अशातच आता अप्लॉज एंटरटेनमेंटनं (Applause Entertainment)त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांचा काळ आणि जीवनाच्या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य अशी या नव्या वेब सीरिजची संकल्पना(Series On Mahatma Gandhi) आहे. यासाठी लागणारी सर्व माहिती प्रख्यात इतिहासतज्ज्ञ राममचंद्र गुहा (Ramchnddra Guha) यांच्या ‘गांधीं’वरील दोन पुस्तकांमधून घेण्यात येणार आहे. त्यासाठी गुहा यांच्या या दोन पुस्तकांचे हक्क स्टुडिओने विकत घेतले आहेत.

गांधींजींची सत्य, प्रेम, अहिंसा आणि लोहासारखी दुर्दम्य इच्छाशक्ती ही शिकवण अगदी कालातीत आहे. गांधीजी हे शांतता आणि मानवतेचे प्रतीक होते. आपल्या कर्तृत्वाने भारतीय इतिहासाची दिशा बदलून टाकणारे ते एक महान नेते होते. जगभरातील अनेक पिढ्यांमधील नेत्यांवर त्यांचा प्रभाव आहे.भारतीय स्वातंत्र्य आपल्या महान स्वातंत्र् सेनानींच्या नजरेतून जिवंत करणं या हेतूने ॲप्लॉज एंटरटेनमेंटनं (Applause Entertainment) गांधींजींवरील चरित्रात्मक वेबसीरिजची (biopic) घोषणा केली आहे. ॲप्लॉज एंटरटेनमेंट (Applause Entertainment) हा आदित्य बिर्ला ग्रुपचा एक उपक्रम आहे. ज्येष्ठ लेखक आणि इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांच्या ‘गांधी बिफोर इंडिया’ (Gandhi Before India) आणि ‘गांधी- द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड’ (Gandhi - The Years that Changed the World’) या दोन पुस्तकांवर आधारित ही सीरीज काही सीझनमध्ये सादर होणार आहे. जगभरातील प्रेक्षक लक्षात घेऊन या सीरीजची निर्मिती केली जाईल आणि भारत तसंच जगभरातील अनेक ठिकाणी याचं शूटिंग केलं जाणार आहे, अशी माहिती निर्मात्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

या सीरीजमधील सगळ्यांत महत्त्वाच्या भूमिकेसाठी म्हणजेच महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी ॲप्लॉज एंटरटेनमेंटनं (Applause Entertainment) आघाडीचा अभिनेता प्रतीक गांधीची निवड केली आहे. या सीरीजमधून भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि आधुनिक युगातील आदर्शाचं आश्चर्यकारक आयुष्य उलगडून दाखवलं जाणार असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे.गांधीजींच्या अगदी सुरुवातीच्या आयुष्यापासून ते दक्षिण आफ्रिकेतील त्यांचा वर्णविरोधी लढा आणि त्यानंतर भारतातील त्यांचा स्वातंत्र्यविरोधातील महान लढा हे महत्त्वाचे प्रसंग, घटना तर या सीरीजमध्ये असतीलच. पण त्याचबरोबर तरुण गांधी ते महात्मा असा त्यांचा प्रवास होण्यासाठी ज्या घटना कारणीभूत ठरल्या, पण ज्यांच्याबद्दल जनतेला फारशी माहिती नाही अशा घटनाही या सीरीजमध्ये असतील. तसंच गांधींजींचे स्वातंत्र्य चळवळीतील समकालीन सहकारी, देशबांधव, गांधीजींबरोबरच आधुनिक स्वतंत्र भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलेल्या अनेक अतुलनीय व्यक्तिमत्वांबद्दलही या सीरीजमध्ये सांगितलं जाणार आहे.

“रामचंद्र गुहा हे एक अत्यंत प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि कथालेखक आहेत. त्यांची ‘गांधी बिफोर इंडिया’ आणि ‘गांधी- द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड’ या क्लासिक पुस्तकांचं पडद्यावर रुपांतर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. महात्मा गांधी यांचं आयुष्य, जगाला आदर्श घालून देणारं त्यांचं शांतता आणि प्रेम यांचं तत्वज्ञान पडद्यावर जिवंत करण्यासाठी आम्हाला प्रतीक गांधीशिवाय अन्य दुसरी व्यक्ती योग्य वाटत नाही. अत्यंत समृध्दपणे, विविध सीझन्समध्ये जर गांधीजींच्या आयुष्यावर सीरीज करण्यात आली तरच गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्यासोबतच्या अनेक महान व्यक्तिमत्वांना खरा न्याय मिळेल. आधुनिक भारताचा जन्म कसा झाला याची कथा जगभरातील प्रेक्षकांना या निमित्ताने समजेल, ” असं Applause Entertainment चे सीईओ समीर नायर (Samir Nair) यांनी सांगितलं.

“गांधीजींच्या कार्यामुळे जगभरात मोठे बदल झाले आणि त्यांचा वारसा अजूनही तितकाच पाळला जातो आहे. भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमधील त्यांचं आयुष्य म्हणजे अगदी अद्भूत प्रवास आहे. स्वातंत्र्यासाठी, धर्मांमध्ये शांतता राखण्यासाठी आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी उदात्त लढा दिला. या संपूर्ण प्रवासात त्यांनी अनेक मित्र जोडले; पण काही शत्रूही निर्माण झाले. Applause Entertainment च्या या महत्वाकांक्षी सीरीजसाठी गांधीवरील माझ्या पुस्तकांची निवड करण्यात आली याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. गांधीजींच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या घटना आणि त्यांच्या शिकवणुकीतील नैतिकमूल्य या सीरीजमधून जगभरातील प्रेक्षकांपुढे यातील असा मला विश्वास आहे, ”अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध इतिहासकार आणि चरित्रकार रामचंद्र गुहा यांनी दिली आहे.

“गांधीजींचं तत्वज्ञान आणि आयुष्यात उपयोगी पडणारं त्यांची अगदी साधी सोपी मूल्यं यांच्यावर माझा अगदी पूर्ण विश्वास आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यातही मी त्यांचे अनेक गुण आणि शिकवण आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. त्यामुळे महात्मा गांधींची भूमिका साकारणं ही नाटकांच्या दिवसांपासून अगदी माझ्या मनातली इच्छा होती. आता या महान नेत्याची भूमिका मला पडद्यावर साकारायला मिळत आहे, हा मी माझा बहुमान समजतो. ही भूमिका अत्यंत निष्ठेने, बारकाईने, विश्वासार्ह पध्दतीने पार पाडणे ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. समीर नायर आणि Applauseमधील त्यांच्या टीमसोबत या भूमिकेचा प्रवास सुरु करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे,” अशी प्रतिक्रिया महात्मा गांधीजींची भूमिका साकारणाऱ्या प्रतीक गांधी यानं दिली आहे.महात्मा गांधीजींच्या जीवनावर आतापर्यंत चित्रपट, जीवनपट येऊन गेले आहेत. नवी सीरिज आपल्याला गांधीजींच्या आयुष्यातील नवा पैलू उलगडून दाखवेल अशी आशा करूया.

First published:

Tags: Entertainment, Mahatma gandhi, Web series