01 एप्रिल : एक आगळी वेगळी हनुमान जयंती ठाण्यात साजरी करण्यात आली. कारण यानिमित्ताने एक माकडचं थेट हनुमंताच्या दर्शनासाठी आलं होतं. निमित्त होतं विजु माने दिग्दर्शित ‘मंकी बात’ या सिनेमाच्या आगळ्या वेगळ्या प्रमोशनचं. विजुचा हा सिनेमा लहान मुलांना आवडेल असाच सिनेमा आहे. येत्या 18 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात चक्क एक माकड मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या भूमिकेसाठी ख्यातनाम मेकअप आर्टीस्ट विद्याधर भट्टे यांनी माकडाचा मास्क तयार करून कलाकाराच्या चेहऱ्यावर बसवला आणि हे माकड तयार केलं आहे. काल झालेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने या माकडाने थेट हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याच्या सिनेमाच्या यशासाठी आशिर्वाद घेतले. त्यामुळे आता हा सिनेमा चाहत्यांच्या आणि लहान मुलांच्या मनावर जादू करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.