मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मिक्का सिंगनं सांगितला अजब इंग्रजीचा किस्सा; रेहमान यांनी उडवली होती खिल्ली

मिक्का सिंगनं सांगितला अजब इंग्रजीचा किस्सा; रेहमान यांनी उडवली होती खिल्ली

ए. आर. रेहमान यांनी लाईव्ह शोमध्ये उडवली होती मिक्का सिंगच्या इंग्रजीची खिल्ली; हा किस्सा ऐकून हसून हसून वेडे व्हाल

ए. आर. रेहमान यांनी लाईव्ह शोमध्ये उडवली होती मिक्का सिंगच्या इंग्रजीची खिल्ली; हा किस्सा ऐकून हसून हसून वेडे व्हाल

ए. आर. रेहमान यांनी लाईव्ह शोमध्ये उडवली होती मिक्का सिंगच्या इंग्रजीची खिल्ली; हा किस्सा ऐकून हसून हसून वेडे व्हाल

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 12 एप्रिल: ए.आर. रेहमान (A R Rahman) हे भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी छोटी सी आशा, रंगीला रे, छैया छैया, रंग दे बसंती, जय हो यांसारख्या अनेक सुपहिट गाण्यांची निर्मिती केली आहे. ऑस्कर पुरस्कारावर (Oscar 2021) नाव कोरणारा हा संगीतकार गाण्यांच्या बाबतीत गंभीर असतो तितकाच तो खऱ्या आयुष्यात मस्तीखोर आहे. एकदा तर लाईव्ह शोमध्ये त्यांनी मिक्का सिंगची (Mika Singh) फिरकी घेतली होती. अन् मिक्का सोडून हा विनोद सभागृहातील सर्व सेलिब्रिटींना कळला होता. पाहूया काय होता तो किस्सा?...

इंडियन प्रो म्युज़िक लीग (Indian Pro Music League) या संगीत शोमध्ये ए. आर. रेहमान यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना मिक्सा सिंगनं हा गंमतीशीर किस्सा सांगितला. मिक्काला एका गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार देण्यासाठी ए. आर. रेहमान स्टेजवर आले होते. रेहमान इंग्रजीत बोलणं अधिक पसंत करतात. त्यामुळं त्यांना इम्प्रेस करण्यासाठी मिक्कानं इंग्रजीत आभार मानण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला इंग्रजी बोलता येत नाही.

अवश्य पाहा - ही अभिनेत्री होती Dharmendra याचं first love; तिला इम्प्रेस करायला झाले होते हिमॅन

त्यामुळं तो “आय वुड लव्ह टू वर्क विथ रेहमान सर” हे वाक्य पाठ करुन आला होता. मात्र स्टेजवर त्यांना पाहून तो इतका गोंधळला की पाठ केलेलं वाक्य विसरुन “रेहमान सर वुड लव्ह टू वर्क विथ मी” असं वाक्य म्हटलं. यावर क्षणाचाही विलंब न करता “हीर तो बडी सॅड है” असं ते म्हणाले. याचा अर्थ तुझं हे वाक्य ऐकून मी दु:खी झालो असा होतो. अर्थात या वाक्याद्वारे त्यांनी मिक्काची फिरकी घेतली. मात्र हा विनोद त्याला कळला नाही. त्यामुळं सभागृहातील सर्वजण त्याच्यावर हसू लागले. यावर मग रेहमान यांनी 'बड़े बड़े देशों में छोटी-छोटी बातें होती रहती हैं' हे वाक्य उच्चारुन ते प्रकरण सावरलं. त्यानंतर मिक्कानं गाणं गाऊन पूर्ण माहोल बदलून टाकला. ए.आर. रेहमान आपल्या ’99’ चित्रपटाच्या गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी ‘इंडियन प्रो म्युज़िक लीग’ च्या सेटवर आले होते.

First published:

Tags: A. R. Rahman, Bollywood, Entertainment, Oscar award show, Singer mika singh